कार्ला- राज्यभरात दहावीच्या परीक्षेला सुरवात झाली असुन मावळ तालुक्यातून सात हजार चाळीस विद्यार्थी तालुक्यातील तेरा केंद्रावर ही परीक्षा देत असल्याची माहिती मावळ गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळंज तसेच मावळ तालुका दहावी तळेगाव केंद्र परिरक्षक नानाभाऊ शेळकंदे यांनी दिली.
कामशेत केंद्रातही  दहावी ची परीक्षा सुरळीत सुरु झाली असन 697  विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत.
कामशेत केंद संचालक धनश्री साबळे, एकविरा मुख्याध्यापक संजय वंजारे, बापूराव नवले यांनी गुलाब पुष्प देऊन  शुभेच्छा दिल्या
तसेच परीक्षा ‘काँफी मुक्त अभियाना ‘साठी व शांततेत पार पाडण्यासाठी लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशन च्या वतिने चोख बंदोबस्त ठेवाण्यात आला असुन दक्षता समितीचे सदस्य ही मदत करत आहे
   ही परीक्षा व्यवस्थीत पार पडावी विद्यार्थ्यांना कुठलीही अडचण न यावी या सांठी  कामशेत केंद्र संचालक म्हणून धनश्री साबळे, उप संचालक उषा बामने, संगीता मनोज, सहाय्यक दत्ता पोवार, पांडुरंग खांडवी प्रयत्न करत आहेत.

error: Content is protected !!