
तळेगाव दाभाडे : नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या नूतन कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अँड रिसर्च या विद्यालयातील विद्यार्थ्यांना आयबीएम स्कीलबिल्ड महाराष्ट्र राज्यस्तरीय हॅकाथॉन शोकेस -२०२५ मध्ये उल्लेखनीय यश मिळाले आहे. या स्पर्धेत कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरींग आर्टिफिशियल इंटेलिजन्स विभागाचे दोन संघ सहभागी झाले होते.
सायरस क्रियटर्स या संघाने एम्पॉवरिंग असेसीबिलिटी इंटरॅक्टिव्ह कॉम्प्युटर सिस्टीम फॉर डिसॅबल पीपल या नाविण्यपूर्ण प्रकल्पाला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. या प्रकल्पामध्ये अपंगत्व असणाऱ्या व्यक्तींना अपंगत्वावर मात करून सामान्य व्यक्तींसारखी हलचाल, हावभाव करता यावेत उदा: हात नसलेली व्यक्ती आपल्या डोळ्याच्या माध्यमातून संगणक हाताळू शकेल आदी वेगवेगळ्या बाबीचा समावेश या प्रकल्पात करण्यात आला. या संघात स्टेफन म्हेत्रे आणि प्रथमेश कुडाळे यांचा सहभाग होता. या संघाला प्रा. वैभव सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले.
तसेच हायपर क्लाउड या संघाने ही उत्कृष्ट कामगिरी करत टॉप नऊ मध्ये स्थान मिळविले या संघाने साईट गाईड वेब नेव्हिगेशन हेल्पर या प्रकल्पावर काम केले. या संघात शंतनू शिंदे आणि आशिष टेम्भेकर यांचा समावेश होते. प्रा. धनश्री कुलकर्णी यांनी या संघाला मार्गदर्शन केले.
या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष संजय ( बाळा) भेगडे, उपाध्यक्ष गणेश खांडगे, सचिव संतोष खांडगे, सहसचिव नंदकुमार शेलार, खजिनदार तसेच अभियांत्रिकीच्या कार्यकारी समितीचे चेअरमन राजेश म्हस्के, अभियांत्रिकीचे सीईओ डॉ. रामचंद्र जहागीरदार, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अपर्णा पांडे, एनएमआयईटी चे प्राचार्य डॉ. एस. एन. सपली, विभागप्रमुख डॉ. सागर शिंदे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचा साहाय्याने समाजोपयोगी प्रकल्प विकसित करत आपली सृजनशीलता सिद्ध केली आहे. या यशामुळे महाविद्यालयात आनंदाचे वातावरण असून सर्व स्तरातून विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.
- फॅशन फ्युजन फेस्टिवल सिझन
- पुणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या संचालक पदी संतोष भेगडे
- मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा स्पर्धेत ‘ पवना विद्या मंदीर प्रथम
- येळसे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मणिषा ठाकर बिनविरोध
- जांभूळच्या ग्रामविकास अधिकारी कल्याणी लोखंडेंना आदर्श ग्रामपंचायत अधिकारी राष्ट्रीय पुरस्कार


