वडगाव मावळ: जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
मुख्य न्यायाधीश आर.एन. चव्हाण यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शिवव्याख्याते अॅड. रवींद्र यादव यांचे ‘शिवकालीन न्यायव्यवस्था’ विषयावर व्याख्यान झाले.

वडगाव वकील बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. संजय वांद्रे, उपाध्यक्ष अॅड. चंद्रकांत खांदवे, अॅड. सुधीर भोंगाडे, सरकारी वकील ठाकरे, अॅड. विकास नवघणे, अॅड. अमोल दाभाडे, अॅड. राजेंद्र भंडारी आदी उपस्थित होते. अॅड. देविदास मराठे यांनी प्रास्ताविक केले. अॅड. अरविंद गोतारणे यांनी आभार मानले.

error: Content is protected !!