ध्येय साध्य करण्यासाठी जीवापाड मेहनत करा : सहाय्यक विभागीय अधिकारी गायकवाड
वडगाव मावळ: ध्येय साध्य करण्यासाठी जीवापाड मेहनत करा असे आवाहन रयत शिक्षण संस्थेचे सहाय्यक विभागीय अधिकारी दत्तात्रय गायकवाड यांनी केले.रयत शिक्षण संस्थेच्या न्यु इंग्लिश स्कूल व ज्यु. कॉलेज येथे इ. १० वी च्या विद्यार्थ्याचा शुभचिंतन सोहळा व वार्षिक पारितोषिक वितरण सोहळ्यात गायकवाड बोलत होते.
यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी शोभा वहिले, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष राजेश गायकवाड, भेगडे लॉन्सचे संचालक गणेश भेगडे, रामदास वाडेकर,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नवीन नवघणे, सदस्य अर्चना मोरे, प्रणिता गुल्हाने, स्वाती खाणेकर, रत्नाकर कोळी, आरती बुरकुले, संजय आगिवले उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानिक स्कूल कमिटी सदस्य मनोज ढोरे होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य सतीश हाके यांनी केले.यावेळी इ. १० वी च्या विद्यार्थीनी श्रृतिका घार्गे, पल्लवी चिमटे, अंवतिका पापळ, मोरे वैष्णवी, कार्तिकी रायकर व श्रृती दाभाडे यांनी मनोगत व्यक्त केले. इ. ९ वी ची विद्यार्थ्यीनी श्रेया दंडेल हिने सर्व १० वी च्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी NMMS परीक्षे मध्ये  पात्र ठरलेल्या 40 विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच शासकीय चित्रकला परीक्षेमध्ये A श्रेणी मध्ये उतीर्ण 15 विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. क्रीडा स्पर्धेतील जिल्हा व विभागीय पातळी वरील विजेते  सुमारे 13 विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
तसेच वार्षिक स्नेहसंमेलनातील विजेते, मेहंदी स्पर्धा, आकाशकंदील मेकिंग स्पर्धा, रांगोळी व चित्रकला स्पर्धा, आनंदबाजार स्पर्धा, ग्रीटिंग कार्ड मेंकिंग, वाचन स्पर्धा, राखी मेंकिंग या सर्व स्पर्धेतील सुमारे 250 विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला, यावेळी बक्षिसे आणि टाळ्या आणि जल्लोष याने सर्व वातावरण भारावून गेले होते.
गणेश भेगडे, रामदास वाडेकर या माजी विद्यार्थ्य्यानी अनुभव सांगितले.उपशिक्षिका मनिषा भोसले व अश्विनी आडकर यांनी इ. १० वी च्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी विक्रम कामथे यांनी विमल नानाभाऊ गोर्डे यांच्या स्मृती प्रित्यर्थ दहावी मध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांना अनुक्रमे पंधरा, दहा व पाच हजार रुपयाचे बक्षिस जाहीर केले.
शिक्षकांचे बहुमोल योगदान लक्षात घेता NMMS ,शिष्यवृत्ती व शासकीय चित्रकला स्पर्धा परीक्षाना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांना यावेळी सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. NMMS विभागप्रमुख जयश्री बोरसे, रूपाली बागबंदे, सविता तांबे, अरंविद ढाकणे, निता शेटे, शासकीय चित्रकला परीक्षा मार्गदर्शक राजेंद्र आडमुठे, दीपा गुंजाळ शिष्यवृत्ती मार्गदर्शक गणेश शेंडगे, रूपाली शेंडगे, सविता मोरे, दिनेश मोरमारे तसेच क्रीडा शिक्षक प्रवीण ढवळे यांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी शरद खांडभोर यांनी हुशार होतकरू विद्यार्थ्यांनी रिया जाधव हिला पुढील शिक्षणासाठी रुपये सात हजार मानधनाचा धनादेश सुर्पद केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निता शेटे व जयश्री बोरसे यांनी केले. आभार पर्यवेक्षिका प्रज्ञा गायकवाड यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्योती भोसले, वंदना सांळुखे, शकिला आत्तार, शैला गीते, वैशाली फुलसुंदर व सर्व शिक्षकवृंद यांनी सहकार्य केले.

error: Content is protected !!