
वडगव मावळ: बारावीच्या परीक्षा सुरू होत असल्याने मोरया प्रतिष्ठानच्या वतीने वडगाव शहरातील न्यू इंग्लिश स्कूल जुनियर कॉलेजमधील बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आज ११ फेब्रुवारी ते १२ मार्च २०२५ रोजी पर्यंत इंद्रायणी कॉलेज येथील परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी मोफत प्रवास सेवेचे नियोजन करण्यात आले आहे.
शैक्षणिक कारकिर्दीतील महत्त्वपूर्ण टप्पा म्हणून समजली जाणारी महाराष्ट्र राज्य व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षा आजपासून सुरू होत असल्याने नगराध्यक्ष मयूर ढोरे आणि मोरया प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अबोली ढोरे यांनी विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प आणि पेन देऊन शुभेच्छा दिल्या.
सामाजिक बांधिलकी जपत आमदार सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या मोरया प्रतिष्ठानच्या वतीने वडगाव कातडी मधील विद्यार्थ्यांसाठी या परीक्षेच्या कालावधीतील संपूर्ण महिनाभर मुला मुलींना जाण्यायेण्यासाठी बस ची व्यवस्था विनामूल्य करून देण्यात आली आहे.
कोणतेही दडपण अथवा भीती न बाळगता परीक्षेस द्या, यश १००% तुमचेच आहे अथक परिश्रम व परिपूर्ण अभ्यास हीच यशाची गुरुकिल्ली मानून परीक्षेला सामोरे जा अशा उज्वल भविष्यासाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांसाठी जाण्यायेण्याची व्यवस्था केल्याबद्दल या सूस्त्य उपक्रमाचे पालक वर्गांनी आणि विद्यार्थ्यांनी मोरया प्रतिष्ठानचे आभार व्यक्त केले.
- गुरूवारी समर्थ शलाका शिष्यवृत्ती परीक्षा पारितोषिक वितरण सोहळा
- सावित्रीबाई फुले स्मृतिदिनानिमित्त कार्यक्षम महिलांचा प्रातिनिधिक सन्मान
- मनिषा सातपुते बेस्ट लाइफ कोच अवॉर्डने सन्मानित
- नूतन अभियांत्रिकीमध्ये महिला दिन उत्साहात साजरा
- बजरंग बलीचा प्राणप्रतिष्ठा व लोकार्पण सोहळा संपन्न : सफर 361 किल्ल्यांची सामाजिक प्रतिष्ठान” दुर्गसेवकांचा उपक्रम


