
सुदवडी मावळ – या आधीच्या उपसरपंच वैशाली नितीन शिंदे यांनी ठरल्याप्रमाणे आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी ही निवडणूक झाली.
सुदवडी ग्रामपंचायत सभागृहात बुधवारी (दि. ५) निवडणूक प्रक्रिया पार पडली. अध्यक्षस्थानि सरपंच सुमित शिवाजी कराळे पाटील होते. उपसरपंच पदांसाठी एकमेव अर्ज आल्याने सदर निवडणूक बिनविरोध झाल्याचे निवडणुक अधिकारी संगीता जाधव यांनी जाहीर केले. याप्रसंगी माजी उपसरपंच वैभव गाडे, वैशाली शिंदे, ग्रामपंचायत सदस्य सायली कराळे, प्रीती शिंदे, प्रतीक्षा वाळुंजकर, माजी उपसरपंच रमेश कराळे, बाबाजी खेडेकर, भाऊसाहेब कराळे, अवतार शिंदे, किसन कराळे, भानुदास कराळे, राजु कराळे उपस्थित होते. तसेच सायंकाळी नवनिर्वाचित उपसरपंचांची भव्य मिरवणूक काढून जल्लोष करण्यात आला. त्यावेळी संदिप काशीद पाटील, दिलीप ढोरे, प्रशांत भागवत, बाजीराव गाडे, बापू दरेकर, सरपंच मंगलताई गाडे, नितीन ताठे, ज्ञानेश्वर कराळे, माजी उपसरपंच बाळासाहेब कराळे, बाळासाहेब कराळे, शांताराम दरेकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित उपसरपंच यांचा सत्कार करण्यात आला.
निवडीनंतर बोलताना गुलाब कराळे यांनी गावातील अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, जलजीवन मिशन, सार्वजनिक शौचालय, महिलांच्या सुरक्षेसाठी सर्वत्र सीसीटीव्ही बसवणे, पाणी पुरवठा, कचरा हे प्रश्न सोडण्यासाठी आगामी काळात प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
- गुरूवारी समर्थ शलाका शिष्यवृत्ती परीक्षा पारितोषिक वितरण सोहळा
- सावित्रीबाई फुले स्मृतिदिनानिमित्त कार्यक्षम महिलांचा प्रातिनिधिक सन्मान
- मनिषा सातपुते बेस्ट लाइफ कोच अवॉर्डने सन्मानित
- नूतन अभियांत्रिकीमध्ये महिला दिन उत्साहात साजरा
- बजरंग बलीचा प्राणप्रतिष्ठा व लोकार्पण सोहळा संपन्न : सफर 361 किल्ल्यांची सामाजिक प्रतिष्ठान” दुर्गसेवकांचा उपक्रम


