भंडारा डोंगर : श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर ‘माघ शुद्ध दशमी सप्ताह सोहळा ‘सुरू आहे. या सप्ताहात माघ शुद्ध दशमीच्या मुख्य दिवशी भगवानगडाचे महंत हभप.श्री. डॉ. नामदेव महाराज शास्त्री सानप यांची कीर्तनसेवा आयोजित केली होती.मात्र, शास्त्री महाराज यांची सेवा स्थगित करण्यात आली आहे.
त्याचे झाले असे की, महाराष्ट्रातील सर्वात मोठा नामयज्ञ सोहळा श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर सुरू आहे.शुक्रवारी ७ फेब्रुवारीला नामदेव महाराज शास्त्री यांची किर्तन सेवा श्रीक्षेत्र भंडारा डोंगर येथे होती.त्यांच्या  किर्तन सेवे बाबत अखंड मराठा समाज महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा यांनी  तळेगाव MIDC पोलिस ठाण्यात पत्र दिले.
याच पत्राच्या आधारे पोलीस प्रशासनाने विश्वस्त मंडळाला समजपत्र दिले.हे  समजपत्र आणि  सद्धपरीस्थितीचा विचार या सेवेला स्थगिती दिली असल्याचे भंडारा डोंगर दशमी सोहळा समितीच्या वतीने सांगण्यात आले.
भगवानगड येथील हभप.श्री. डॉ. नामदेव महाराज शास्त्री सानप, यांचे सहकारी हभप.श्री. विष्णुपंत खेडकर यांच्याशी विचारविनिमय झाला असल्याचे प्रसिध्दीस दिलेल्या पत्रात म्हटले आहे. या दिवशी हभप.डॉ. सुदाम महाराज पानेगावकर यांची कीर्तनसेवा होईल अशी माहिती श्री.विठ्ठल रुखमाई तुकाराम महाराज भंडारा डोंगर ट्रस्टने दिली.

error: Content is protected !!