वडगाव मावळ : राज्याचे उपमुख्यमंत्री पदी अजित पवार व मावळ विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले आमदार सुनिल शेळके यांच्या अभिनंदनाच्या ठरावाला मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत टाळ्यांचा कडकडाट झाला.
मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे यांच्या अध्यक्षतेखाली येथे तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सहविचार बैठक झाली.या बैठकीत उपमुख्यमंत्री पदी अजित पवार यांची व मावळ विधानसभा मतदारसंघाच्या आमदार पदी मोठे मताधिक्याने विजयी झाल्याबद्दल आमदार सुनिल शेळके  यांचा अभिनंदनाचा ठराव तालुकाध्यक्ष खांडगे यांनी मांडला, त्याला पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी पवार आणि शेळके यांचे अभिनंदन केले.
विधानसभा निवडणुकीनंतर पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीतील ही पहिली बैठक झाली. या बैठकीला सुकाणू समितीचे पदाधिकारी, तालुका कार्यकारणी, सेल अध्यक्ष, गाव अध्यक्ष मोठय़ा संख्येने उपस्थित होते.महायुतीच्या वतीने शनिवारी ता.८ फेब्रुवारीला आमदार शेळके यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. यावर सकारात्मक चर्चा या बैठकीत झाली. विधानसभा निवडणुकीत अहोरात्र काम करणाऱ्या कार्यकर्ते बंधू भगिनींचे खांडगे यांनी कौतुक केले.
संघटनात्मक कामाचा आढावा घेताना खांडगे म्हणाले, ” पक्ष संघटनेची वाटचाल करीत असताना सभासद नोंदणी झाली. गाव, विभाग, वॉर्ड व शहर निहाय संघटना उभी राहिली. सर्व सेल अॅक्टिव्ह राहिले.संघटनेचे तालुकास्तरीय प्रशिक्षण शिबीर यशस्वी पणे राबवले. पंढरीनाथ ढोरे यांनी प्रास्ताविक केले. किशोर सातकर यांनी सुत्रसंचालन केले. दिपाली गराडे यांनी आभार मानले.

error: Content is protected !!