चैतन्य इंटरनॅशनल स्कूलमध्ये ७६ वा प्रजासत्ताक दिन राष्ट्रभक्तीच्या उत्साहात आणि अभिमानाने साजरा
इंदोरी : चैतन्य चॅरिटेबल फाउंडेशन संचालित चैतन्य इंटरनेशनल स्कूल (CBSE), येथे ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्स्फूर्तपणे साज़रा करण्यात आला. प्रमुख पाहुणे राजकुमार बाबुराव अगरवालआणि शाळेच्या प्राचार्या हेमलता खेडकर यांच्या हस्ते ध्वजपूजन करण्यात आले.
इयत्ता ५ वी ते ९ वी च्या विद्यार्थ्यांनी मार्च पास्ट परेड सादर केली. देशप्रेमावर आधारित गाणी व नृत्यांचे सादरिकरण झाले , विद्यार्थ्यांनी अनेकांमध्ये एकता यावर आधारित एक नृत्य नाटिका सादर केली. तसेच विद्यार्थ्यांनी डंबेल्स आणि घुंगरू काठी याची कवायत व नववीच्या विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने मानवी मनोरा (Human pyramid ) सादर केले.
शाळेच्या प्राचार्या हेमलता खेडकर यांनी आपले विचार व्यक्त करताना म्हणाल्या चैतन्य इंटरनॅशनल स्कूल ने विद्यार्थ्यांची भावी पिढी घड़वायची जवाबदारी घेतली आहे. यासाठी आम्ही सर्व कटिबद्ध व प्रयत्नशील आहोत व पालक देत असलेल्या सहकार्याबद्दल, मी पालकांचे आभार मानते. त्यांच्या सहयोग आणि शाळेवर असलेल्या विश्वासामुळे हे आम्ही सर्व हे कार्य सहजपणे करू शकतो.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरोजनी आलदी व आशिष सप्ताळे यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन क्रीडा शिक्षिका कु. प्रियांका मोरे यांनी केले.
- माघ शुद्ध दशमीच्या डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांच्या कीर्तनाला स्थगिती
- ‘मनाचे श्लोक’ पाठांतर स्पर्धेस मोठा प्रतिसादात संपन्न
- वस्तीगृहातील मुलींसमवेत लेकीचा वाढदिवस : बाबन्ना कुटुबांचे बर्थडे सेलेब्रिशेन
- मावळ राष्ट्रवादीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री पवार व आमदार शेळकेंच्या अभिनंदनाचा ठराव
- राज्यस्तरीय अभिवाचन स्पर्धेत ‘बलम सामी’ प्रथम