टाकवे बुद्रुक :राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे बाळराजे असवले  इंग्लिश मिडीयम स्कूल आणि सरपंच चिंधू मारुती असवले इंग्लिश मिडीयम हायस्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.  ध्वजपूजन आणि ध्वजवंदन संस्थेचे संस्थापक सचिव रामदास वाडेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष  शिवाजी असवले , खजिनदार तानाजी असवले,संचालक  भूषण असवले आणि सोमनाथ असवले यांच्या सह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण केले.
सिनियर केजी ते दहावी पर्यंतच्या अनेक विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिना विषयी इंग्रजी  मधून भाषणे दिली.स्कूलचे मुख्याध्यापक  राज कांबळे आणि मुख्याध्यापिका.प्रियंका कुडे यांनी सूत्रसंचालन केलेस्कूलच्या शिक्षिका ऐश्वर्या मालपोटे, कांचन जाचक, सोनम शहा ,पूजा कालेकर ,ऋतुजा धनाड ,रूपाली जाधव, नेहा असवले, स्वाती भांडवलकर, काजल वाडेकर ,नयना डेव्हिड, अमिता जोशी, श्वेता कदम  यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

error: Content is protected !!