वडगाव मावळ – विद्यार्थी करियर घडविण्यासाठी स्पर्धा परीक्षा काळाची गरज आहे असे प्रतिपादन रोटरी सिटीचे उपाध्यक्ष भगवान शिंदे यांनी यावेळी केले. मावळ तालुक्यातील जवन या माध्यमिक शाळेतील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी आणि अथर्व इंडस्ट्रियल प्रायव्हेट लिमिटेड यांचे संयुक्त विद्यमाने पवन मावळातील पवना धरणाच्या अतिदुर्गम आणि डोंगराळ भागातील संत ज्ञानेश्वर विद्यानिकेतन जवन या माध्यमिक शाळेतील विद्यार्थिनींना मोफत सॅनिटरी नॅपकिन वाटप समारंभ नुकताच संपन्न झाला त्याचबरोबर बौद्धिक व क्रीडा स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ पाहुण्यांच्या हस्ते संपन्न झाला.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रोटी सिटीचे उपाध्यक्ष भगवान शिंदे होते
याप्रसंगी रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटीचे संचालक राजेंद्र कडलग, अजीवलीच्या सरपंच आशाताई भिकोले, शालेय समिती सदस्य भगवान भिकोले,शाळेचे मुख्याध्यापक रमेश आरगडे, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
शिंदे पुढे बोलताना म्हणाले की,मावळ तालुक्यातील १५ ते २० गावातील डोंगराळ आणि दुर्गम भागातील विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेतात शाळेतील शिक्षक शनिवार, रविवारी विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन करतात विद्यार्थी करियर घडविण्यासाठी स्पर्धा परीक्षा काळाची गरज आहे तसेच त्यांनी रोटरीच्या कार्याची माहिती विशद केली व ग्रामीण भागातील शिक्षक विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी विशेष प्रयत्न करतात असेही भगवान शिंदे यांनी सांगितले सह प्रकल्प प्रमुख संजय चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जिद्द आत्मविश्वास व चिकाटी यांच्या जोरावर आपण यश मिळवू शकतो असे प्रतिपादन केले.
रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटी चे डायरेक्टर राजेंद्र कडलग, अजीवलीच्या सरपंच आशाताई भिकोले, शालेय समिती सदस्य भगवान भिकोले, यांनी मनोगताद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.शाळेचे मुख्याध्यापक रमेश आरगडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर सूत्रसंचालन वर्षा बारबोले यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.
- माघ शुद्ध दशमीच्या डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांच्या कीर्तनाला स्थगिती
- ‘मनाचे श्लोक’ पाठांतर स्पर्धेस मोठा प्रतिसादात संपन्न
- वस्तीगृहातील मुलींसमवेत लेकीचा वाढदिवस : बाबन्ना कुटुबांचे बर्थडे सेलेब्रिशेन
- मावळ राष्ट्रवादीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री पवार व आमदार शेळकेंच्या अभिनंदनाचा ठराव
- राज्यस्तरीय अभिवाचन स्पर्धेत ‘बलम सामी’ प्रथम