वडगाव मावळ: मकरसंक्रांतीचे औचित्य साधून मोरया महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अबोली मयूर ढोरे यांच्या संकल्पनेतून भव्य पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या पतंग महोत्सवाचे यंदाचे तिसरे वर्ष आहे.शहरातील लहानांपासून ते जेष्ठांपर्यंत सुमारे दीडहजार पतंगप्रेमींनी पतंग उडविण्याचा आनंद घेतला.
सर्व पतंग प्रेमींना मोरया प्रतिष्ठानच्या वतीने माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या वतीने पतंग आणि दोऱ्याचे रीळ विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आले. लहान मुले-मुली, युवक तसेच पालकांनी मनसोक्त पतंग उडवण्याचा आनंद लुटला.
यावेळी काॅंग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष बाळासाहेब ढोरे, माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे, मोरया महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अबोली ढोरे, माजी सरपंच बापूसाहेब वाघवले, पंढरीनाथ ढोरे, पुणे काईट्स चे प्रमुख रमेश पारते, श्रीकांत चेपे, उद्योजक सचिन कडू आणि वडगाव शहरातील हजारों पतंगप्रेमी, मोरया महिला प्रतिष्ठानचे पदाधिकारी, संचालिका, आणि शहरातील लहान मुले-मुली, नागरिक, मित्रपरिवार आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मकरसंक्रांत निमित्ताने महादजी शिंदे टेकटीजवळील मैदानात घेण्यात आलेल्या या पतंग महोत्सवात आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध प्रकारचे पतंग प्रत्यक्षात उडवण्याची तसेच पाहण्याची सुवर्णसंधी या नवीन वर्षाच्या सुरुवातीच लहान मुलांना तसेच पालकांना अनुभवायला मिळाल्याने सर्वांनी आनंद व्यक्त केला. या पतंग महोत्सवातील मोठ्या पतंगावर छत्रपती शिवाजी महाराज, पांडुरंगाची, डोरेमॉन यांच्या प्रतिकृतीचे पतंग आकाशात झेपावल्याने लहानासह नागरिकांनी आनंद व्यक्त केला.
नेहमीप्रमाणे सामाजिक बांधिलकी जपत येत्या कालावधीतही वडगाव शहरातील नागरिकांसाठी अशाच सामाजिक, सांस्कृतिक, कला मनोरंजन आणि अत्यावश्यक अशा समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात येईल अशी माहिती मोरया प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अबोली मयूर ढोरे यांनी दिली.
- मावळच्या विकासासाठी कटिबद्ध असून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देणार – खासदार श्रीरंग बारणे
- मावळ प्रीमियर लीग स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी स्त्रीशक्तीच्या हस्ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व महाआरती
- तळेगाव दाभाडेत ‘ स्वाक्षरी वरून स्वभाव दर्शन ‘ कार्यक्रम
- शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्याचे भूसंपादन आणि निविदा कार्यवाही वेगाने : दिक्षित
- प. पु. सद्गुरु श्री गगनगिरी महाराज पालखी सोहळ्याचे चैतन्य इंटरनॅशनल स्कूल (CBSE) तर्फे उत्साहात