वडगाव मावळ: आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या पाठपुराव्याने महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान अभियान अंतर्गत सुमारे ६५ लक्ष ९२ हजार इतक्या निधीतून वडगाव नगरपंचायत हद्दीतील केशवनगर येथील प्रभाग क्रमांक १ मधील गोखले लेआउट परिसरात ५ दशलक्ष लिटर पाण्याची टाकी बांकामास सुरुवात करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी डॉ प्रविण निकम यांनी दिली.
यावेळी मा नगराध्यक्ष मयूर ढोरे, माजी उपसरपंच पंढरीनाथ ढोरे, नगरपंचायत अधिकारी आणि संबंधित कामाचे ठेकेदार उपस्थित होते. खूप वर्षापासून प्रलंबित असलेला पाण्याच्या प्रश्न आणि केशवनगर परिसरातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करून याभागात नव्याने पाच दशलक्ष क्षमतेचा जलकुंभ उभारण्यात येत आहे.
अखेर पाण्याचा प्रश्न मार्गी लागत असल्याने आणि प्रत्यक्ष कामालाही सुरुवात होत असल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले. लवकरात लवकर या पाण्याच्या टाकीचे काम पूर्ण होऊन नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा होणार असल्याचे मा नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी सांगितले आहे.