टाकवे बुद्रुक:
टाकवे बुद्रुक व परिसरातील एका वर्गात शिकणारे हे मित्र अठरा वर्षांनी एकत्र भेटले परंतू नुसतेच भेटले नाही तर सामाजिक काम करून ती भेट त्यांनी अविस्मरणीय करून टाकली.
निमित्त होते कडाक्याच्या थंडीचे..! मावळ तालुक्यातील पाऊस जितका प्रसिद्ध तितकीच थंडी देखील प्रसिद्ध आहे.या पार्श्वभूमीवर २००६ साली दहावी पास झालेले टाकवे बुद्रुक येथील शाळेत एकाच वर्गात शिकलेले अमित असवले (गोरक्षक -मावळ तालुका),पांडुरंग जाचक,एकनाथ मालपोटे,विकास असवले, संतोष होले, साजन असवले विशाल असवले, सुनील आंबेकर हे मित्र १८ वर्षांनी एकत्र आले.
आंदर मावळ मधील कुसवली येथील सहारा वृद्धाश्रमापासून त्यांनी स्वेटर वाटण्यास सुरुवात केली. त्यानंतर तालुक्यातील सर्व अनाथाश्रम, बालगृह, येथील गोरगरिबांना उबदार स्वेटर ऐन थंडीत वाटले. आपल्या मैत्रीची भावना समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करीत जुन्या आठवणी देखील उबदार करण्याचे अनोखे काम त्यांनी या निमित्ताने केले.