पवनानगर: रोटरी क्लब ऑफ पुणे सिंहगड रोड यांच्या सहकार्याने व शिव विद्या प्रतिष्ठान यांच्या मार्गदर्शनाखाली आर. सी. सी. ब्राम्हणोली यांनी वारु व ब्राम्हणोली गावातील ग्रामस्थ व महिलांसाठी मोफत आरोग्य शिबीर आयोजित केले होते.
रोटरी क्लब पुणे सिंहगड रोडचे मिलिंद बिवलकर, अभय देवरे, अनिता पंडीत व व्हीटेस्को टेक्नॉलॉजीस यांच्या सहकार्याने आरोग्य उपक्रमाची उभारणी करण्यात आली आहे.यावेळी रोटरी क्लब पुणे सिंहगड रोडचे रेणुका पंडीत, अवंती देवरे, रेणुका इंगळे व अमित पासलकर उपस्थित होते. तसेच शिव विद्या प्रतिष्ठान प्रमुख शिल्पा कशेळकर व संतोष वंजारी उपस्थित होते.
फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया गोरान ग्रॉसकोफ फॅमिली क्लिनिक यांचे टिम प्रमुख नितिन दळवी व एच. व्ही.देसाई हॉस्पिटलचे टिम प्रमुख किशोर खडसे व त्यांच्या सर्व टीमने आरोग्य तपासणी चे काम उत्तमरित्या पार पाडले.आर. सी.सी. ब्राम्हणोली अध्यक्ष योगेश काळे, तसेच कमिटी सदस्य शंकर काळे, अंकुश काळे, विशाल मोरे, संदिप काळे यांनी सहकार्य केले.
यावेळी आरोग्य तपासणीसाठी 70 महिला व 37 पुरुषांनी सहभाग घेतला. युवती व महिलांसाठी मासिकपाळी तसेच कॅन्सर संदर्भात विशेष आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच डोळे तपासणी साठी एकूण 94 महिला व पुरुष सहभागी झाले होते. 9 डिसेंबर रोजी झालेल्या जेष्ठ नागरिकांच्या शिबिरातील 3 महिला व 4 पुरुष अशी एकूण 7 जणांची मोतीबिंदूची ऑपरेशन रोटरीच्या आर्थिक सहकार्याने एच. व्ही. देसाई हॉस्पिटल मध्ये यशस्वी झाली आहेत.
सर्वांना गरजेनुसार औषध गोळ्या देण्यात आल्या व आवश्यकते नुसार  चष्मे देण्यात आले.  रोटरीच्या तर्फे मोतीबिंदूचे मोफत ऑपरेशन करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.आरोग्य तपासणीसाठी सहभागी झालेल्या सर्व ग्रामस्थांनी विशेष करून महिलांनी रोटरीचे धन्यवाद मानले.

error: Content is protected !!