लोणावळा: येथील ॲड.बापूसाहेब भोंडे हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी उद्योगपती डॉ.अशोक खाडे हे या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. डॉक्टर खाडे यांनी विद्यार्थ्यांना आपण जीवनात शिक्षणासाठी केलेला खडतर प्रवास व संघर्ष त्याचबरोबर जीवनात यशस्वी झाल्यानंतरचा कौटुंबिक प्रवासाची यशोगाथा मांडली.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष ॲड.  माधवराव भोंडे यांनी शाळेच्या नवीन लोगोचे अनावरण केले. या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष ॲड. माधवराव भोंडे त्याचबरोबर नवनिर्वाचित उपाध्यक्ष नारायण भार्गव,संस्थेच्या सचिव राधिका भोंडे,संचालिका भार्गव ,प्रकल्प प्रमुख पुष्पेंदु रक्षित ,रमाविलास भोंडे,संजीव वीर,डॉ.संजय पुजारी ,आनंद नाईक,माजी नगरसेविका बिंद्रा गणात्रा,लोणावळा शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष विशाल पाडाळे,विशाल विकारी, प्रशांत पुराणिक ,संजय पाटील ,माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका  माधवी थत्ते,पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका  अंजुम शेख ,माध्यमिक विभागाच्या उपमुख्याध्यापिका तृप्ती गव्हले ,प्राथमिक विभागाच्या उपमुख्याध्यापिका  स्मिता इंगळे,पर्यवेक्षिका असाव, स्मिता वेदपाठक ,शशिकला तिकोणे यांसह पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
पहिल्या दिवशी इयत्ता पाचवी ते अकरावीच्या विद्यार्थ्यांचा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम पार पडला तर दुसऱ्या दिवशी नर्सरी ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा विविध गुणदर्शन आणि पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम पार पडला.
प्राथमिक व माध्यमिक विभागातून उत्कृष्ट नृत्य सादर करणाऱ्या वर्गांना  विवेक घाणेकर यांच्याकडून सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका माधवी थत्ते व अंजुम शेख यांनी केले तर संस्थेच्या सचिव राधिका भोंडे यांनी  विद्यालयाचा वार्षिक आढावा पालकांसमोर स्क्रीनच्या माध्यमातून मांडला स्मिता वेदपाठक व शशिकला तिकोणे यांनी  आभार मानले. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट पद्धतीने सूत्रसंचालन करत कार्यक्रम यशस्वी पार पाडला.

error: Content is protected !!