टाकवे बुद्रुक: यशवंतराव चव्हाण कला क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात केंद्रस्तरीय जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या स्पर्धा येथे मोठ्या उत्साहात पार पडल्या.
क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग गोल्ड मेडल विजेती हर्षदा शरद गरूड हिच्या हस्ते करण्यात आले.यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. टाकवे बुद्रुक केंद्रातील इयत्ता पहिली ते आठवीच्या अकरा शाळांमधील चारशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सांस्कृतिक बौद्धिक व मैदानी खेळ खूप महत्त्वाचे असून खेळांमध्ये संघभावना आणि व्यक्तिमत्व विकास होत असल्यामुळे खेळात अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा असे मार्गदर्शन हर्षदा गरुड यांनी केले. केंद्रप्रमुख संगीता भालघरे यांनी खेळात प्रगती करून विद्यार्थ्यांनी आपल्या गावाचे, जिल्ह्याचे व देशाचे नाव उज्वल करावे असे आवाहन केले.
यावेळी सरपंच सुवर्णा असवले उपसरपंच प्रतीक्षा जाधव, न्यू इंग्लिश स्कूल टाकवे बुद्रुक चे प्राचार्य जांभुळकर , एचडीएफसी बँकेचे मॅनेजर राजेन्द्र काळे, प्रकल्प अधिकारी अमोल जाधव , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप मालपोटे ,गणेश काटकर ,श्रीकांत मोढवे, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक बंधू, भगिनी व ग्रामस्थ जिल्हा परिषद शाळा टाकवे बुद्रुक चे मुख्याध्यापक अतुल गायकवाड उपस्थित होते. सूत्रसंचालन नम्रता कांबळे यांनी केले, कबड्डी,खो-खो, बुद्धिबळ,लोकनृत्य,कविता गायन, भजन, लंगडी, लेझीम,धावणे व प्रश्नमंजुषा इत्यादी स्पर्धा झाल्या.
- ब्राम्हणोली व वारु गावातील ग्रामस्थांसाठी रोटरी क्लब आयोजित मोफत आरोग्य शिबिर
- भारतीय कालगणना विज्ञान आधारित – डॉ. अजय अपामार्जने
- कामशेतच्या आश्रमशाळेत पिकणार फळभाज्या
- ॲड.बापूसाहेब भोंडे हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न : डॉ.अशोक खाडे यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडली जीवनगाथा
- प्रशासकीय अधिकारी बनण्यासाठी शालेय जीवनात स्पर्धा परिक्षेची तयारी आवश्यक – संतोष खांडगे