इंदोरी: चैतन्य इंटरनॅशनल स्कूलचा वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांनी विविध खेळ आणि स्पर्धांमध्ये जोमाने सहभाग घेतला, ज्यामुळे हा दिवस अविस्मरणीय ठरला.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या रंगीत आणि देखण्या संचलनाने झाली. प्रमुख पाहुणे किशोर हिरामण नखाते (युवा महाराष्ट्र केसरी) यांच्या हस्ते क्रीडा मशाल प्रज्वलित करण्यात आली. या मशाल प्रज्वलनाने शिस्तबद्धता, ऊर्जा आणि प्रेरणेचा प्रकाश विद्यार्थ्यांमध्ये पसरवला. विद्यार्थ्यांनी Running, Relay, Ring race, Go to School, Book balance यांसारख्या वेगवेगळ्या खेळांमध्ये हिरारीने सहभाग घेतला. खालील विद्यार्थ्यांनी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला
प्रथम क्रमांक : वंश जाधव, अदिती कुमारी, शिवाज्ञा पवार, आरोही त्यागी , गौरीश पवार, संस्कृती ठाकुर, विहांत जाधव, हर्षदा ठाकुर, अनुष्का ढोरे, ज्ञानेश्वरी जाधव, रिया शिंदे, रुद्र शिर्के, सुप्रीम मंडल, कुणाल पवार, मयूर पवार
द्वितीय क्रमांक वृषभ कुंभार, अविरा कोकरे, विहान राठोड, हिरल महाजन , नीरज महागडे, आराध्या भेगडे, साईराज पवेकर, आर्या शर्मा, सायबा खान, सानिया शेख, गायत्री नायर, अखिलेश यादव, सुजल ढोरे , अथर्व भसे, शैलेश यादव
तृतीय क्रमांक : आरव जाधव, अयांश जाधव,सुलेमान टपाले, ओजस्वी रसाळ , श्रेयस वाडेकर, महिमा कांबळे, संस्कार पवार सुमेधा कांबळे, प्रांजल शिंदे, राणी मुखिया, त्रिशा दाभाडे, आकाश तारकर, शौर्य पवार , शिवम पवार, शिवम नामसुदरा.
उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते सर्व विजेत्यांना पदके आणि प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली, यावेळी अथर्व भसे, लावण्या दाभाडे , अखिलेश यादव , साहेबा खान या मुलांना अनुक्रमे U-14 व U-17 मुल व मुली या गटातून “BEST SPORTSMEN OF THE YEAR -2024-25” प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले अग्नी हाऊसला एकूण विजेतेपदाचा सन्मान देण्यात आला.
तसेच श्रेयश पोंदल, सुप्रीम मंडल यांच्या नेतृत्वाखाली इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी लाठीकाठी, दंडबैठक, भूमी नमस्कार आणि सूर्यनमस्कार यांसारख्या पारंपरिक भारतीय खेळांनी या क्रीडा महोत्सवाला सांस्कृतिक वैभवाची जोड दिली.
विद्यार्थ्यांनी कौशल्यपूर्ण खेळ, संघभावना आणि शिस्तबद्धता दाखवून कार्यक्रमाला एका नव्या शिखरावर नेले. पालकांनीही या सोहळ्यात आपली उपस्थिती लावून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. या प्रसंगी “FIRE IN CITY” या पालकांच्या स्पर्धेत श्री. कांबळे यांनी सुवर्ण पदक पटकावले
शाळेचे चेअरमन श्री. भगवान शेवकर, सेक्रेटरी राधिका शेवकर आणि गावातील मान्यवर मंडळी उपस्थित होती. प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांचे यथोचित कौतुक करत त्यांना सतत प्रगती करण्यासाठी प्रोत्साहन दिले.
शाळेच्या मुख्याध्यापिका हेमलता खेडकर यांनी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल अभिनंदन केले व त्यांना क्रीडा आणि सहशालेय उपक्रमांमध्ये सक्रीय राहण्यासाठी प्रेरित केले.
कार्यक्रमाचे सुयोग्य सूत्रसंचालन श्री. आशिष सप्ताळे सर व विजया जाधव मॅडम यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन आणि अंमलबजावणी आमच्या क्रीडा शिक्षिका प्रियांका मोरे यांच्या कुशल नेतृत्वाखाली करण्यात आले. कार्याकामाच्या शेवटी आभार प्रदर्शन सौ. सरोजिनी आल्दी यांनी केले
हा क्रीडा दिन विद्यार्थ्यांमध्ये संघभावना, निरोगी स्पर्धा आणि शारीरिक सुदृढतेची महत्त्वपूर्ण जाणीव निर्माण करणारा ठरला. कार्यक्रमाच्या भव्यतेने आणि शिस्तबद्धतेने तो सर्वांच्या मनात एक सुवर्णक्षण कोरून गेला.
- कामशेतच्या आश्रमशाळेत पिकणार फळभाज्या
- ॲड.बापूसाहेब भोंडे हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न : डॉ.अशोक खाडे यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडली जीवनगाथा
- प्रशासकीय अधिकारी बनण्यासाठी शालेय जीवनात स्पर्धा परिक्षेची तयारी आवश्यक – संतोष खांडगे
- संत तुकाराम महाराजांच्या पादुका हेलिकॉप्टरने श्रीक्षेत्र बोटा येथे आज जाणार
- चिंचवडच्या ज्येष्ठ नागरिकांनी घालविला वृद्धाश्रमात दिवस