कामशेत: भरधाव कारने दिलेल्या धडकेत नायगाव येथील पती पत्नीचा अपघातात मृत्यू झाला. या दुदैवी घटनेने संपूर्ण मावळ तालुक्यात हळहळ होत आहे. ही अत्यंत दुदैवी घटना आहे. गणेश दत्तात्रय चोपडे व अर्चना गणेश चोपडे असे या अपघात मृत पावलेल्या पती पत्नींची नावे आहे. शनिवारी रात्री अकराच्या सुमारास पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्गावर नायगाव जवळ हा अपघातात झाला. पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्गावर धावणाऱ्या कार, टेम्पो, बस, डंपर यांच्या वेगावर नियंत्रण नसल्याने असे वारंवार अपघात होत आहे. वडगाव मावळ फाटा येथे ही डंपरने दिलेल्या धडकेत वराळे येथील मराठे यांचा ही शनिवारी दुपारी डंपरने ठोकलेल्या अपघातात मृत्यू झाला. अशा घटनांन संपूर्ण कुटुंबाचा आधार हरपतो.
- कामशेतच्या आश्रमशाळेत पिकणार फळभाज्या
- ॲड.बापूसाहेब भोंडे हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न : डॉ.अशोक खाडे यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडली जीवनगाथा
- प्रशासकीय अधिकारी बनण्यासाठी शालेय जीवनात स्पर्धा परिक्षेची तयारी आवश्यक – संतोष खांडगे
- संत तुकाराम महाराजांच्या पादुका हेलिकॉप्टरने श्रीक्षेत्र बोटा येथे आज जाणार
- चिंचवडच्या ज्येष्ठ नागरिकांनी घालविला वृद्धाश्रमात दिवस