![](https://mavalsatya.com/wp-content/uploads/2024/10/img-20241002-wa000014343872733027110428-1024x768.jpg)
![](https://mavalsatya.com/wp-content/uploads/2024/10/img-20241002-wa000116252552129193595578-1024x768.jpg)
पिंपरी: महात्मा गांधी जयंती निमित्त चिंचवडेनगर येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आले. संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पिंपरी चिंचवड शहर आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका ब प्रभाग यांच्या संयुक्त विद्यमाने चिंचवडेनगर परिसरातून स्वच्छता अभियानाचे आयोजन संस्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.मोहन गायकवाड आणि ब प्रभाग अधिकारी अमित पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली केले होते.
यामध्ये संस्कार प्रतिष्ठानचे सभासद आणि ब प्रभाग सर्व अधिकारी आणि आरोग्य कर्मचारी यांनी सहभाग घेतला होता या अभियानात चिंचवडेनगर परिसरातील रस्त्याच्या दुतर्फा बाजूचे सर्व प्लास्टिक आणि इतर कचरा स्वच्छता करून अभियान राबविले.
यामध्ये संस्कार प्रतिष्ठानचे संजीत पद्मन,जयवंत सूर्यवंशी ,अनुषा पै विद्या भागवत ,पल्लवी नायक ,सहाय्यक आरोग्य अधिकारी सुधीर वाघमारे,मुख्य आरोग्य निरीक्षक भूषण शिंदे,आरोग्य निरीक्षक शंकर घाटे,आरोग्य सहाय्यक-सागर सणस.आरोग्य मुकादम- नवनाथ मोहोळ आरोग्य मुकादम-सचिन गोरगेल यांनी संयोजन करून सहभाग घेतला होता.
- माघ शुद्ध दशमीच्या डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांच्या कीर्तनाला स्थगिती
- ‘मनाचे श्लोक’ पाठांतर स्पर्धेस मोठा प्रतिसादात संपन्न
- वस्तीगृहातील मुलींसमवेत लेकीचा वाढदिवस : बाबन्ना कुटुबांचे बर्थडे सेलेब्रिशेन
- मावळ राष्ट्रवादीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री पवार व आमदार शेळकेंच्या अभिनंदनाचा ठराव
- राज्यस्तरीय अभिवाचन स्पर्धेत ‘बलम सामी’ प्रथम
![](https://mavalsatya.com/wp-content/uploads/2024/10/picsart_23-09-30_12-00-02-2881-978150607260326846473-717x1024.jpg)
![](https://mavalsatya.com/wp-content/uploads/2024/10/picsart_24-04-01_21-21-59-5922148108637214359458-1024x576.jpg)
![](https://mavalsatya.com/wp-content/uploads/2024/10/picsart_23-05-06_00-30-39-3071-985516659557793087970-882x1024.jpg)
![](https://mavalsatya.com/wp-content/uploads/2024/10/picsart_22-09-02_21-12-10-4005027696332743570809-1024x932.jpg)
![](https://mavalsatya.com/wp-content/uploads/2024/10/picsart_24-08-22_22-24-28-672660599946004408881-655x1024.jpg)