पवनानगर:
विद्यार्थ्यांनी भारताचा एक जबाबदार नागरिक होऊन वंचितांच्या सेवेसाठी तयार राहावे असे आवाहन नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव संतोष खांडगे यांनी केले.
येथील पवना विद्या मंदिरातील १५ विद्यार्थींना मोफत सायकल वाटपांप्रसंगी खांडगे बोलत होते. येथे पाच किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावरुन विविध गावातून पायी चालत शाळेत येणाऱ्या १५ गरीब व गरजू मुलींना रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीच्या मोफत सायकल वितरित करण्यात आल्या.
यावेळी रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीचे अध्यक्ष मिलिंद शेलार,सचिव राजेंद्र पंडित, डायरेक्टर डॉ. अशोक दाते,अजय पाटील, पवना शिक्षण संकुलाचे प्राचार्य भाऊसाहेब आगळमे सर व शिक्षकवृंदासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संतोष खांडगे म्हणाले, विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना वेळ जाऊ नये त्यासाठी अनेक सेवाभावी संस्था विद्यार्थ्यांना मदत करत असतात या सुविधेचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांनी भारताचा एक जबाबदार नागरिक होऊन वंचितांच्या सेवेसाठी तयार राहण्याचे आवाहन केले.
यावेळी बोलताना रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीचे अध्यक्ष मिलिंद शेलार म्हणाले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी जास्तीत जास्त वेळ भेटत नाही कारण त्यांना पायपीट करून शाळेत यावे लागते त्यासाठी सायकल वाटप करण्यात आले आहे.२६ जानेवारी रोजी अजून ५० सायकली रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीच्या वतीने उपलब्ध करून देण्यात येणार आहे
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संकुलाचे प्राचार्य भाऊसाहेब आगळमे यांनी केले सुत्रसंचलन वैशाली कोयते व भारत काळे यांनी केले तर आभार महादेव ढाकणे यांनी मानले.
- माघ शुद्ध दशमीच्या डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांच्या कीर्तनाला स्थगिती
- ‘मनाचे श्लोक’ पाठांतर स्पर्धेस मोठा प्रतिसादात संपन्न
- वस्तीगृहातील मुलींसमवेत लेकीचा वाढदिवस : बाबन्ना कुटुबांचे बर्थडे सेलेब्रिशेन
- मावळ राष्ट्रवादीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री पवार व आमदार शेळकेंच्या अभिनंदनाचा ठराव
- राज्यस्तरीय अभिवाचन स्पर्धेत ‘बलम सामी’ प्रथम