वडगाव मावळः रौप्य महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करणाऱ्या मावळ विचार मंच आयोजित सरस्वती व्याख्यानमालेच्या या वर्षाच्या अध्यक्षपदी मावळ पंचायत समितीचे माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर यांची निवड करण्यात आली.
कार्याध्यक्षपदी पुजा प्रसाद पिंगळे यांची तर कार्यक्रम प्रमुखपदी भक्ती सागर जाधव यांची निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी संतोष भालेराव, सचिवपदी अमोल ठोंबरे,खजिनदारपदी मकरंद बवरे यांची  निवड झाली आहे.
मावळ विचार मंचाचे संस्थापक भास्करराव म्हाळसकर, कार्याध्यक्ष डॉ. रवींद्र आचार्य, आणि सर्व संचालक मंडळ आणि सदस्यांच्या प्रमुख उपस्थितीत या सर्व  निवडी करण्यात आल्या.
सरस्वती व्याख्यानमालेचे या वर्षाचे २४ वे वर्ष आहे.गुरुवार दि ३ ते शुक्रवार दि ११ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत दररोज सायंकाळी ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिर प्रांगणात व्याख्यानमाला संपन्न होणार आहे.सालाबादप्रमाणे याही वर्षी नामांकित वक्त्यांची व्याख्याने होणार आहे. लोकप्रतिनिधी आणि अन्य मान्यवर या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थितीत राहणार आहेत.

error: Content is protected !!