साते मावळ : येथील पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटीच्या  फार्मसी विभागाकडून  जागतिक फार्मासिस्ट दिन उत्साहात साजरा करण्यात आला. फार्मसी च्या विद्यार्थ्यांनी कामशेत येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात पथनाट्य सादर केले आणि पथनाट्यातून त्यांनी प्रतिजैविके, नशामुक्ती, औषधांचा योग्य वापर आणि औषधे घेताना घ्यावयाची काळजी यासंदर्भात जनजागृती केली.
त्यानंतर कामशेत मधील सर्व फार्मासिस्ट यांचा सत्कार केला गेला. कामशेत नगरीचे सरपंच श्री रुपेश गायकवाड, उपसरपंच श्री दत्तात्रय शिंदे आणि केमिस्ट असोसिएशन चे  सागर येवले यांचा सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रमात प्राचार्य डॉ. राजेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे नियोजन  डॉ. सागर कोरे यांनी केले. कार्यक्रमामध्ये डॉ. सविता देवकर , प्रा. मयुरेश राऊत, प्रा. हर्षदा पुराणिक, प्रा. दीपाली व्हनकडे प्रा.दीक्षिता पाटील,प्रा. आकांचा कुमारी, प्रा. अंकिता जटाले यांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाच्या नियोजनासाठी पिंपरी चिंचवड एजुकेशन ट्रस्ट चे सर्व विश्वस्त आणि संस्थचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, कुलगुरू डॉ. मणिमाला  पुरी, प्र. कुलगुरू डॉ. सुदीप थेपडे यांनी मार्गदर्शन केले आणि आवश्यक संसाधनांची पूर्तता केली.

error: Content is protected !!