तळेगाव दाभाडे: सुप्रसिद्ध साहित्यिक आणि कामगार नेते कै. ॲड. सहदेव मारुती मखामले यांचे ४ सप्टेंबर २०२४ रोजी आकस्मित निधन झाले. त्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी आदरांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
तळेगाव येथील त्यांनी स्थापन केलेल्या साहित्य कला आणि संस्कृति मंडळाने इतर कामगार संस्थांच्या सहकार्याने रविवार दिनांक २९ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी १०.३० वाजता सुशिला मंगल कार्यालय, जुना पुणे मुंबई रस्ता, तळेगाव दाभाडे येथे ‘आठवणीतले सहदेव मखामले’ या आदरांजली सभेचे आयोजन केले आहे.
साहित्य क्षेत्रातील नामांकित साहित्यिक, विविध संघटनांचे कामगार नेते, राजकीय, कला व सांस्कृतिक क्षेत्रातील विविध मान्यवर या आदरांजली सभेसाठी उपस्थित राहणार आहेत. कै.ॲड .सहदेव मखामले यांचे साहित्य क्षेत्रातील अनमोल योगदान आणि नवोदित साहित्यिकांसाठी त्यांनी उपलब्ध करुन दिलेल्या व्यासपीठाच्या माध्यमातून त्यांचे भरीव काम आहे.
त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील सर्वदूर पसरलेल्या विविध शासकीय, निमशासकीय व खासगी अस्थापनांमध्ये असलेल्या तळागाळातील कामगारांसाठी निःस्पृहपणे झटून विविध संघटनांच्या माध्यमातून त्यांनी केलेली कामगार सेवा सर्वदूर परिचित आहेच. त्यामुळे त्यांच्याबद्दल असलेली सामाजिक आस्था व श्रध्दा बाळगणाऱ्या विविध संस्थांच्या एकत्रित योगदानातून साहित्य कला आणि संस्कृति मंडळाने त्यांच्या संस्थापक अध्यक्षांच्या स्मरणार्थ आयोजित केलेली ही सभा आहे.
या आदरांजली सभेसाठी विविध क्षेत्रातल्या त्यांच्या स्नेहीजनांनी आवर्जून उपस्थित रहावे आणि त्यांना श्रध्दांजली अर्पण करावी असे आवाहन साहित्य कला आणि संस्कृति मंडळ (ट्रस्ट) चे विश्वस्त सचिव अर्जुन गायकवाड व अध्यक्षा ॲड. रंजना भोसले यांनी केले आहे.
- माघ शुद्ध दशमीच्या डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांच्या कीर्तनाला स्थगिती
- ‘मनाचे श्लोक’ पाठांतर स्पर्धेस मोठा प्रतिसादात संपन्न
- वस्तीगृहातील मुलींसमवेत लेकीचा वाढदिवस : बाबन्ना कुटुबांचे बर्थडे सेलेब्रिशेन
- मावळ राष्ट्रवादीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री पवार व आमदार शेळकेंच्या अभिनंदनाचा ठराव
- राज्यस्तरीय अभिवाचन स्पर्धेत ‘बलम सामी’ प्रथम