वडगाव मावळ : साते येथील नवजीवन नागरी सहकारी पतसंस्था आणि जिजामाता महिला नागरी सहकारी पतसंस्था यांच्या वतीने विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सामाजिक संस्थांचा संकल्प सामाजिक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
संस्थेच्या वतीने मावळ तालुका विचार मंच, एकवीरा देवी जोगेश्वरी दुर्गा परमेश्वरी विवाह सोहळा समिती, मावळ तालुका वारकरी संप्रदाय मंडळ, नवनीत करियर अकॅडमी, शिवदुर्ग बचाव पथक, स्व. पै. केशवराव ढोरे प्रतिष्ठान, मोरया महिला प्रतिष्ठान, कुलस्वामिनी महिला मंच, सत्यमेव महिला महामंच, ब्राह्मणवाडी या संस्थांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
तसेच खरेदी-विक्री संघाचे संचालक गणेश विनोदे, आशा खांडभोर, एकनाथ येवले, किरण हुलावळे व नवनिर्वाचित सरपंच संदीप शिंदे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. जिल्हा दूध संघाचे संचालक बाळासाहेब नेवाळे, भाजप निवडणूकप्रमुख रवींद्र भेगडे, सारिका शेळके, एकवीरा देवी ट्रस्टचे अध्यक्ष दीपक हुलावळे, भाजपचे प्रभारी भास्करराव म्हाळसकर, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, पंढरीनाथ ढोरे, भरत मोरे, बाळासाहेब भानुसघरे, विजय सातकर, नंदकुमार भसे, अबोली ढोरे, किरण भिलारे, अनंता कुडे, संतोष शिंदे, वर्षा नवघने, ऋषीनाथ आगळमे, व्याख्याते विवेक गुरव, वि. म. शिंदे, संस्थेचे संस्थापक मारुती आगळमे, अध्यक्ष उमेश शिंदे आदींच्या उपस्थितीत व गोविंदराव पानसरे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला.
संस्थेचे संस्थापक मारुती आगळमे, अध्यक्ष उमेश शिंदे, उपाध्यक्ष पांडूरंग आगळमे, सीईओ वदन आगळमे, खजिनदार अशिष शिंदे यांनी संयोजन केले होते. अतुल सातकर यांनी सूत्रसंचालन केले, माजी उपसरपंच अनिल मोहिते यांनी आभार मानले.

error: Content is protected !!