तळेगाव दाभाडे: संचालकांनी सभासदांच्या हित लक्षात घेऊन संचालकांनी पतसंस्था वाढीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे असे मत पुणे महानगर नियोजन समितीचे सदस्य व नगरसेवक संतोष भेगडे यांनी मावळ तालुका माध्यमिक शिक्षक पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत व्यक्त केले
मावळ तालुका माध्यमिक शिक्षक पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा तळेगाव दाभाडे येथील ॲड पु. वा. परांजपे विद्या मंदिर येथील सभागृहात संपन्न झाली यावेळी कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे पुणे महानगर नियोजन समितीचे सदस्य व तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी नगरसेवक संतोष भेगडे उपस्थित होते या कार्यक्रमासाठी पतसंस्थेचे संस्थापक विलास भेगडे, जेष्ठ सल्लागार भाऊसाहेब आगळमे, मुख्य प्रवर्तक धनंजय नांगरे,पतसंस्थेचे अध्यक्ष भारत काळे, उपाध्यक्ष अशोक कराड, कार्यकारी संचालक राम कदमबांडे, खजिनदार भाऊसाहेब खोसे यांच्यासह संचालक धनकुमार शिंदे,सोपान असवले, सुमन जाधव, दत्ता गायकवाड, विजय वरघडे, अमोल जाधव आदी उपस्थित होते
पुढे बोलताना भेगडे म्हणाले की, शिक्षकांसाठी अनेक बचत योजना राबवून तसेच जास्तीत जास्त ठेवी घेऊन सभासदांना कर्ज वाटप करावे
यावेळी बोलताना भाऊसाहेब आगळमे ,विलास भेगडे व अध्यक्ष भारत काळे यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत ज्या सभासदांनी अविरतपणे शैक्षणिक क्षेत्रात काम करत असताना मावळ तालुका माध्यमिक शिक्षक पतसंस्थेसाठी योगदान देऊन पतसंस्था वाढीसाठी व प्रगतीसाठी प्रयत्न केले आहेत निवृत्त सभासदांचा सन्मान  करण्यात आला तसेच  सभासदांच्या पाल्यांनी विविध क्षेत्रात नैपुण्य प्राप्त करत यश संपादन केले त्यांचा सन्मान  करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पतसंस्थेचे कार्यकारी संचालक राम कदमबांडे, सुत्रसंचलन सुमन जाधव व वैशाली कोयते यांनी केले तर आभार संचालक सोपान असवले यांनी मानले.
पतसंस्थेचे माजी अध्यक्ष नारायण असवले यांची कन्या आंदर मावळातील पहिली सी.ए वेदांगी असवले हीने मान मिळवला तसेच शिक्षक परिषद मावळचे अध्यक्ष लक्ष्मण मखर यांची कन्या   वैष्णवी मखर ही सी.ए परिक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाली आणि जेष्ठ सभासद वशिष्ठ गटकुळ यांची कन्या तेजश्री गटकुळ ही जिल्हा परिषद पुणे येथे वित्त विभागात रुजू झाली म्हणून त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

error: Content is protected !!