पिंपरी:संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याच्या सदस्य अनुषा श्रेयस पै यांना कोल्हापूर येथील जनकल्याण सामाजिक संस्थेच्या वतीने गौरवण्यात आले.पै यांचा गेली दहा वर्ष केलेल्या सामाजिक कार्याबद्दल राज्यस्तरीय समाज रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
पै यांनी गेली दहा वर्ष पिंपरी चिंचवड शहरामध्ये संस्कार प्रतिष्ठांनच्या माध्यमातून स्वच्छता अभियान प्लास्टिक मुक्त जनजागृती अभियान पर्यावरण पूरक गणेशोत्सव जनजागृती अभियान बेटी बचाव बेटी पढाव तसेच कोरोनाच्या कालावधीमध्ये गरजू लोकांना अन्नधान्याचे किट वाटप जेष्ठ नागरिकांना औषधांचे घरोघरी जाऊन वाटप केले .
दरवर्षी गणेशोत्सवामध्ये पर्यावरण पूरक गणेशोत्सव जनजागृती करून गणपती दान आणि निर्माल्य दान उपक्रमात हिरीरीने सहभाग घेतात रक्तदान शिबिरात सहभाग वृक्षारोपण अशा विविध उपक्रमात गेली दहा वर्ष सहभाग घेऊन तो कार्यक्रम पूर्ण केला
याची दखल घेऊन कोल्हापूर येथील जनकल्याण सामाजिक संस्थेने राज्यस्तरीय समाज रत्न पुरस्कार कोल्हापूर जिल्हा भाजपाचे अध्यक्ष माननीय महेश जाधव आणि जेष्ठ कीर्तनकार भगवान महाराज यांच्या हस्ते देण्यात आला.

error: Content is protected !!