सर्व पिंपरी:पिंपरी चिंचवड महानगरपालिका ब प्रभाग आणि संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पिंपरी चिंचवड शहर यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त  शेखर सिंह  व ब प्रभाग अधिकारी  अमित पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली रिवर व्ह्यू घाट बिर्ला हॉस्पिटल रोड चिंचवडगाव येथे  गौरी गणपती विसर्जनाच्या नवव्या दिवशी  595 गणेश मूर्तींचे दान मिळाले.आणि 3 टन निर्माल्य स्वीकारले.
या उपक्रमात प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कम्प्युटर स्टडी चिंचवड पुणे यांनी सहभाग घेतला होता.एकुण 60 NSS चे  विद्यार्थी तसेच डाॅ डी वाय पाटील फार्मसी महाविद्यालय पिंपरीचे एन एस एस चे 40 विद्यार्थी सहभागी झाले होते.या उपक्रमाचे संयोजन संस्कार प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर मोहन गायकवाड संस्थेचे कार्याध्यक्ष राजेंद्र फडतरे संस्थेचे सचिव आनंद पाथरे संस्थेचे उपाध्यक्ष शब्बीर मुजावर संस्थेचे खजिनदार मनोहर कड अनुशा पै रमेश भिसे मनिषा आगम जितेंद्र  अभिजित पाटील सायली सुर्वे लक्ष्मण सकुंडे स्वप्निल सुतार यांनी केले होते .पिंपरी चिंचवड ब प्रभाग अभियंता राजकुमार सूर्यवंशी चेतन देसले रसूल शेख रमेश कपूरे प्रविण शेळके अनिल ढाले यांनी सहकार्य केले.

error: Content is protected !!