तळेगाव दाभाडे: येथे प्राथमिक आरोग्य केंद्र व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव येथे  मुख्य कार्यकारी अधिकारी  संतोष पाटील ,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन देसाई  तसेच जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.विकास वडगाई  यांच्या मार्गदर्शनाखाली  हे उद्घाटन झाले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सोनवणे, वैद्यकीय अधिकारी डॉ.जयंत कळकुटे,डॉ.भारती पोळ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव डॉ.मनोज चौधरी व डॉ.दिनेश महालिंगे,प्रतिमा वंजारी STS,मारुती सूर्यकांर  STLS व इतर आरोग्य कर्मचारी यांच्या उपस्थितीत पार पडला.
उद्घाटन प्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सोनवणे यांनी एडल्ट बीसीजी लस घेण्याचे महत्त्व व उपयोगीतेबद्दल पात्र लाभार्थ्यांना मार्गदर्शन केले .तसेच मावळ तालुक्यातील सर्व 18 वर्षावरील जोखमीच्या लाभार्थ्यांना लस घेण्याचे आवाहन केले.
‘क्षयरोग हा मायक्रोबॅक्टेरियम ट्यूबर क्लोसिस या जिवाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे क्षयरोग आजारी संसर्गजन्य आजार असला तरी तेसर्व प्रकार संसर्गजन्य नाही. जेव्हा फुफुसाचा TB असलेला रुग्ण खोकतो किंवा शिकतो तेव्हा TB चे  जिवाणू हवेत पसरतात .जवळपासचे लोक जेव्हा श्वास घेतात तेव्हा या जिवाणूमुळे संक्रमित होऊ शकतात .फुफ्फुसा व्यतिरिक्त इतर अवयवांचा टीबी हा संसर्गजन्य नाही.
¶टीबीचा संसर्ग असा होत नाही_ हस्तांदोलन केल्याने ,एकत्रित जेवण केल्याने ,प्रासंगिक संपर्काने ,सार्वजनिक स्वच्छतागृह वापरल्या,ने रक्त संक्रमणाने टीबी या आजाराचा प्रतिबंध करता येऊ शकतो. चांगले पोषण खोकल्याचे शिष्टाचार टीबी प्रतिबंधक उपचार बीसीजी लस घ्यावी. जास्त गर्दी टाळा,ध्रुवपान आणि मद्यपान टाळा.
संसर्गजन्य क्षयरोग रोखण्याचा एकच मार्ग म्हणजे लवकर निदान व लवकर उपचार त्यासाठी क्षयरोग प्रतिबंधक उपचार टीपीटी आणि बीसीजी लसीकरण या प्रतिबंधक उपायामुळे टीबीचा संशय कमी होण्यास मदत मिळू शकते .एडल्ट बीसीजी ही लस अठरा वर्षावरील वयाच्या जोखमीच्या प्रौढ व्यक्तीमध्ये टीव्हीचा प्रभाव व प्रमाण कमी करण्यासाठी वापरण्यात येत आहे.

error: Content is protected !!