![](https://mavalsatya.com/wp-content/uploads/2024/09/img-20240903-wa00068635955341454273498-1024x768.jpg)
![](https://mavalsatya.com/wp-content/uploads/2024/09/img-20240903-wa00054541407972794750298-1024x576.jpg)
![](https://mavalsatya.com/wp-content/uploads/2024/09/img-20240903-wa0004678491622232813069-1024x576.jpg)
पिंपरी:संस्कार प्रतिष्ठान आणि जयवंत प्राथमिक शाळा भोईर नगर चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने भोईरनगर ,दळवीनगर परिसरात पर्यावरणपूरक गणेश उत्सव जनजागृती फेरीचे आयोजन केले. याचे संयोजन संस्कार प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ.मोहन गायकवाड आणि जयवंत प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका वंदना सावंत यांनी केले होते.
संस्कार प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ.मोहन गायकवाड यांनी पर्यावरण पूरक गणेशोत्सव कसा साजरा करावा याविषयीचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना दिले.गणोशोत्सव काळात शाडू माती किंवा इको फ्रेंडली मूर्तीची स्थापना करून पर्यावरण पूरक सजावट करा.
विसर्जनाच्या वेळी मूर्ती घरीच विसर्जन करा किंवा मूर्ती दान करा.निर्माल्य दान करा,मातीचा पुनर्वापर करा.पारंपरिक वाद्य संगीत वाजवा. सजावटीसाठी थर्माकोल आणि प्लास्टिकचा वापर टाळा. रासायनिक रंगांचा वापर टाळा. अशा विद्यार्थ्यांनी घोषणा दिल्या आणि जनजागृती केली. या अभियानात कविता वाल्हे,अनुषा पै ,पल्लवी नायक,शिवाजी पाटील,सुनिता गायकवाड, इशिता गायकवाड शिक्षक आणि शिक्षिका बसवेश्वर औरादे,ज्योती गुराळकर,शबाना शेख,वंदना कोरपे ,जयश्री मोरे,नंदा डांगे यांनी सहकार्य केले.
- मावळचा युवा मल्ल केतन घारे याने महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पटकावले रौप्यपदक
- संविधान हा भारतीय लोकशाहीचा आत्मा! – ॲड. सतिश गोरडे
- माघ शुद्ध दशमीच्या डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांच्या कीर्तनाला स्थगिती
- ‘मनाचे श्लोक’ पाठांतर स्पर्धेस मोठा प्रतिसादात संपन्न
- वस्तीगृहातील मुलींसमवेत लेकीचा वाढदिवस : बाबन्ना कुटुबांचे बर्थडे सेलेब्रिशेन
![](file:///data/user/0/org.wordpress.android/cache/picsart_23-09-30_12-00-02-288(1)-262433652880589032568.jpg)
![](file:///data/user/0/org.wordpress.android/cache/picsart_24-04-01_21-21-59-5215251319153856892778.jpg)
![](file:///data/user/0/org.wordpress.android/cache/picsart_23-05-06_00-30-39-307(1)-278500680050456799976.jpg)
![](file:///data/user/0/org.wordpress.android/cache/picsart_22-09-02_21-12-10-3295359362935216968198.jpg)