पिंपरी: संस्कार प्रतिष्ठान आणि पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे प्राथमिक विद्यालय आकुर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने आकुर्डी परिसरात पर्यावरणपूरक गणेश उत्सव जनजागृती अभियान राबविण्यात आले होते.
संस्कार प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ.मोहन गायकवाड आणि पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे प्राथमिक विद्यालय आकुर्डीचे प्राचार्य योगिता काळे यांनी संयोजन केले होते.गणेशत्सव व नवरात्र उत्सव काळात शाडू माती किंवा इको फ्रेंडली मूर्तीची स्थापना करून पर्यावरण पूरक सजावट करा,विसर्जनाच्या वेळी मूर्ती घरीच विसर्जन करा किंवा मूर्ती दान करा,निर्माल्य दान करा,मातीचा पुनर्वापर करा,पारंपरिक वाद्य संगीत वाजवा.
सजावटीसाठी थर्माकोल आणि प्लास्टिकचा वापर टाळा. रासायनिक रंगांचा वापर टाळा. असे आवाहन करण्यात आले. या अभियानात संजिद पद्मन वर्ग शिक्षिका वर्षा नलावडे वर्गशिक्षक प्रकाश कदम ,मनोज मेदनकर ,शबाना मनेर यांनी सहकार्य केले.
- एस.एन.बी.पी. विधी महाविद्यालयाच्या वतीने ‘गोसासी राजगुरुनगर’ येथे मोफत कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न
- शब्दधन काव्यमंच आयोजित साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी आमदार शंकर जगताप
- ३१ जानेवारीला लायन इंटरनॅशनल (प्रांत ३२३४ डी – २) च्या वतीने मोफत कृत्रिम पायरोपण आणि कुबड्या वाटप शिबिर
- प्रजासत्ताक दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर व महिलांना साडी वाटप
- स्वावलंबनातून देश समक्ष होईल! – मिलिंद देशपांडे