तळेगाव दाभाडे :मायमाऊल्यांनी बांधलेल्या राखीचे सुरक्षा कवच आणि सुरक्षेची  ढाल माझ्या पाठीशी असल्याने मला कसलाच धोका नसल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.जनसन्मान यात्रेनिमित्त मावळ तालुक्यात आयोजित केलेल्या जाहीर मेळाव्यात उपमुख्यमंत्र्यांनी हा विश्वास व्यक्त केला. 

आमदार सुनिल शेळके यांच्या पुढाकारातून येथील समाजसेवक नथूभाऊ भेगडे पाटील प्राथमिक शाळेच्या प्रांगणात हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या महिलांशी संवाद साधताना पवार बोलत होते.तळेगाव शहराच्या ऐतिहासिक,सांस्कृतिक ,शैक्षणिक,राजकीय पार्श्वभूमीचा आढावा घेत पवार यांनी या मेळाव्यातील महिलांच्या लक्षणीय उपस्थिती बद्दल सॅल्युट केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे,महिला अध्यक्षा 

रूपाली चाकणकर, युवक अध्यक्ष सुरज चव्हाण,जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, माजी जिल्हाध्यक्ष सुरेश घुले,संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे,माजी तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे,माजी तालुकाध्यक्ष विठ्ठलराव शिंदे,जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाबूराव वायकर, यज्ञसेनीराजे दाभाडे सरकार,सारीका शेळके यांच्यासह अन्य मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

व्यासपीठासमोरील भव्य मंडपात हजारो महिला यांची उपस्थिती होते.जितक्या महिला मंडपात होत्या तितक्याच महिला मंडपाबाहेरील रस्त्यावर होत्या. शहरी व ग्रामीण भागातून आलेल्या हजारो महिलांच्या उपस्थितीत आमदार सुनिल शेळके यांनी भावनिक साद घातली. त्यांचा कंठ दाटून आला.डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या. 

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी शेळकेंच्या पाठीवर थाप टाकीत त्यांना सावरले. लिंब फाट्यावरून बैलगाडीतून पवार यांची मिरवणूक काढण्यात आली.ढोलताशाचा गजर,नाशिक बाजाचा दणदणाट,फटाक्याची अतिषबाजीत पवारांचे स्वागत झाले.रस्त्यावर आकर्षक रांगोळीच्या पायघड्या घातल्या. जेसीबीतून पुष्पवृष्टी केली. रस्त्याच्या दुतर्फा तिरंगी कापड लावले होते.तर ठिकठिकाणची स्वागत कमानी लक्ष वेधून घेत होत्या. 

रक्षाबंधनाच्या निमित्त पवार यांना राखी बांधण्यात आली.याच राखीचा धागा पकडून पवार यांनी माता भगिनींच्या आशीर्वादाचे कवच आपल्या पाठीशी ठाम असल्याचा विश्वास व्यक्त करीत स्त्री शक्तीला धन्यवाद दिले.

अजित पवार म्हणाले,” महाराष्ट्रात महिलांच्या चेहर्‍यावर आनंद ओसांडून पाहतो. माता माऊली पडले ते काम करते.या महिलांनाही अधिकार मिळाला पाहिजे. त्यांच्या आयुष्यात आनंदाचे दिवस आले पाहिजे.लाडकी बहीण योजनेच्या विरोधक कोर्टात गेले.अरे  शहाण्यांनो  तुमची दानत नाही आम्ही देत तर देऊ देत नाही. युगपुरुष छत्रपती शिवाजीमहाराज व यशवंतराव चव्हाण यांनी दिलेलेच मार्गाने आम्ही जातो. राज्य सुफलाम सुफलाम करण्याचा संकल्प आम्ही केला आहे.

error: Content is protected !!