ताजेतील चेतन केदारीची ग्रामविकास अधिकारीपदी निवड   

मावळ तालुक्यातुन अभिनंदनाचा वर्षाव ; रत्नागिरीत नियुक्ती

कामशेत: नाणे मावळाच्या ताजेतील चेतन दत्ता केदारी यांची ग्रामविकास अधिकारी पदी निवड झाली. महाराष्ट्र शासनाकडून घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेतून त्याला ही संधी मिळाली रत्नागिरी जिल्ह्यात ग्रामविकास अधिकारी पदाची तो सुत्र घेणार आहे. खुल्या प्रवर्गातून ही निवड झाली आहे. 

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत खेडेगावच्या  शेतकरी कुटुंबातील युवकाची काम व व्यवसाय करत ग्रामविकास अधिकारीपदी निवड झाल्याबद्दल त्याचे कौतुक होत आहे. ग्रामस्थ, मित्र- मंडळी, नातेवाईक व मावळवासियांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 

चेतन यांचे प्राथमिक शिक्षण गावच्या जिल्हा परिषद शाळेत तर माध्यमिक शिक्षण श्रीमती शांतीदेवी गोपीचंद गुप्ता विद्यालय भाजे येथे झाले. चेतन हे कृषी पदवीधर असून त्यांनी डी. वाय. पाटील कॉलेजमधून BSc. Agriculture ही पदवी प्राप्त केली आहे. कॉलेज नंतर चेतन काम करत अभ्यास करत होते. काही महिने हॉटेल व्यवसाय केला.नशिबाने तीन- चार वेळा निकालाच्या अतिशय जवळ जाऊन त्यांना हुलकावणी दिली होती, पण ह्यावेळी जिद्द,  प्रयत्न तसेच अभ्यासाच्या जोरावर खुल्या प्रवर्गातून ग्रामसेवक अधिकारी पदी नियुक्ती मिळवली आहे. 

ही परीक्षा ग्रामविकास विभागाकडून IBPS संस्थेमार्फत घेण्यात आली होती. सदर परीक्षा 200 गुणाची होती. ज्यात मराठी 30 गुण, इंग्लिश 30 गुण, सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी 30 गुण, बुद्धिमत्ता आणि गणित 30 गुण व तांत्रिक घटक 80 गुण अशी रचना होती. यामध्ये चेतन उत्तीर्ण झाले असून ग्रामविकास अधिकारी पदी नियुक्त झाले आहे. 

कुटुंबाची साथ ठरली मोलाची

चेतन दत्ता केदारी हे कृषी पदवीधर आहेत.  कृषी पदवी असो किंवा ग्रामविकास अधिकारी पद, घरातील आई- वडील , भाऊ, मामा आणि मित्रपरिवार यांचे त्यांना या प्रवासात मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.

error: Content is protected !!