
बैलगाडा छकडी संघटनेच्या अध्यक्षपदी विजय टाकवे कार्याधक्षपदी सुरेश गायकवाड ;सचिव नवनाथ शेटे
कामशेत: मावळ-मुळशी-हवेली तालुका बैलगाडा छकडी संघटनेच्या अध्यक्षपदी करंजगावचे विजय शिवाजी टाकवे यांची बिनविरोध निवड झाली.
बैलगाडा मालक संघटनेच्या बैठकीत ही बिनविरोध निवड करण्यात आली.तसेच बैलगाडा छकडी संघटनेच्या कार्याधक्षपदी सुरेश गायकवाड व संदीप आंद्रे तर सचिवपदी नवनाथ शेटे, सह-सचिव रंगनाथ सावंत यांची निवड करण्यात आली. संघटनेच्या कार्यकारणीमधे उपाधक्ष पदी देवराम गायकवाड,नवनाथ पडवळ,प्रविण घरदाळे व सनी हुलावळे तर खजिनदार स्वप्निल तरस व सचिन काजळे यांची सह-खजिनदार म्हणून नेमणूक करण्यात आली.
संघटनेच्या माध्यमातून बैलगाडा शर्यतीला पारंपारिकता जपत डिजिटल संकल्पनेतून ग्लोबल रुप देण्याचा संकल्प संघटनेचा वतीने संकल्प करण्यात आला.
- रमेश जांभुळकर यांचे निधन
- सोहम् ग्रंथालयाच्या वतीने महात्मा फुले आणि डॉ. आंबेडकर यांना अभिवादन
- मैं ना भूलूंगा…’ मैफलीद्वारे स्वर्गीय मनोजकुमार यांना सांगीतिक श्रद्धांजली
- नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी मध्ये राष्ट्रीय प्रकल्प स्पर्धा संपन्न
- अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तळेगाव शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन




