वाकड: पोस्टल कॉलनी वाकड येथील आनंद ज्येष्ठ नागरिक संघाची ११वी वार्षिक सर्वसाधारण सभा दि २८ जुलै रोजी बर्ड व्हॅली वाकड सभागृहात वाजता संपन्न झाली.पहिल्या सत्राची सुरुवात राष्ट्रगीताने होऊन त्यानंतर मागील महिन्यात देवाज्ञा झालेल्या सभासदांना श्रद्धांजली वाहिली.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे .मयूर.कलाटे, स्वाती.कलाटे, वृषाली मरळ,अध्यक्षस्थानी आनंद ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष भागवत कोल्हे हे होते. मयूर कलाटे यांच्या हस्ते सरस्वती पूजन होऊन दीप प्रज्वलन झाले.
गणेश वंदना,सरस्वती वंदना,स्वागत गीत,महाराष्ट्र गीत होऊन त्यानंतर मान्यवरांचा स्वागत आणि सत्कारांचा कार्यक्रम संस्थेचे पदाधिकारी अध्यक्ष भागवत कोल्हे, लहाने, बोरकर, प्रवीण कुलकर्णी, तेली,बह्राटे, बोरकर,.कळमकर आणि अन्य कार्यकारणी सदस्यांच्या हस्ते पार पडला.
७५ वर्षे पूर्ण झालेल्या सभासदांचा सत्कार शाल, श्रीफळ सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.या प्रसंगी शैलजा कामत यांनी मनोगत व्यक्त केले.
संघासाठी विशेष योगदान करणाऱ्या शोभा गाडेकर, अशोक बोंडे, अप्पासाहेब तेली,तसेच सांस्कृतिक कार्यक्रम समिती मार्फत गीत सादर करणाऱ्या महिला मीरा बोरकर छाया निकुंभ अलका कळमकर,चित्रा बर्हाटे,हेमांगी बोंडे, सुनीता सफाई, रुबी पूरकायस्थ, विजया चौधरी,हर्षाली देसाई, पुष्पा ढवळे, विभा दरेकर, प्रतिभा गवळे यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते झाला.
अहवाल पत्रिकेसाठी प्रवीण कुलकर्णी, सुरेश बोरकर, डॉ रमेशचंद्र बियाणी,अप्पासाहेब तेली,उत्तमचंद्र चोरडिया, श्रीकांत रेवणकर, माधव बर्हाटे, विनोदकुमार तिवारी,दिगंबर आळणे, राजेंद्र देसाई यांनी परिश्रम घेतले.
सारिका हातेकर, आरती टेकाडे यांचा सत्कार प्रमुख पाहुणे मयूर कलाटे आणि वृषाली मारळ यांच्या हस्ते करण्यात आला.
तर पत्रकार बाबू डिसोजा, छायाचित्रकार माधुरी डिसोजा यांचा विवेष सत्कार करण्यात आला.प्रसिद्धी विभाग उत्कृष्ट पणे सांभाळणाऱ्या अशोक बोंडे, हेमांगी बोंडे यांचा सन्मान करण्यात आला.
स्वाती कलाटे आणि वृषाली मगर यांनी मनोगत व्यक्त केले.दुसऱ्या सत्रात अहवाल वाचन झाले.यात मागील वृत्तांत वाचन बोरकर करण्यात आले.वार्षिक अहवाल वाचन लहाने, ताळेबंद आणि उत्पन्न व खर्च वाचन केले.बऱ्हाटे यांनी या आर्थिक वर्षा साठी अंतर्गत हिशोब तपासनीस नेमणेची सुचना केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन गिरमे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली.