कामशेत:
माध्यमिक विद्यालय सांगिसे येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सांगिसे ता. मावळ येथील बोधिसत्व प्रतिष्ठान संचालित माध्यमिक विद्यालय सांगिसे या विद्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका सुनिता वंजारी होत्या.यावेळी जयंतीनिमित्त डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी विद्यार्थ्यांनी भाषणे करून बाबासाहेबांच्या कार्याविषयी माहिती दिली.
शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका सुनिता वंजारी यांनी प्रास्ताविक करून मार्गदर्शन केले.तर ज्ञानेश्वर अरनाळे,अंबादास गर्जे यांनी बाबासाहेबांचा ‘जीवनपट व कार्य’ याचे सखोल मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले.सानिका पालवे,सुजल गायकवाड या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ठ भाषणे केली.
कार्यक्रमाचे संयोजन संस्थेचे अध्यक्ष गोकुळ गायकवाड व सचिव लहू कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सविता शिंदे यांनी तर आभारप्रदर्शन अनिल शिंदे यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दशरथ ढोरे,अमोल आल्हाट व विद्यार्थी प्रतिनिधी अंकुश शेडगे यांनी परिश्रम घेतले.
- कामशेतच्या आश्रमशाळेत पिकणार फळभाज्या
- ॲड.बापूसाहेब भोंडे हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न : डॉ.अशोक खाडे यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडली जीवनगाथा
- प्रशासकीय अधिकारी बनण्यासाठी शालेय जीवनात स्पर्धा परिक्षेची तयारी आवश्यक – संतोष खांडगे
- संत तुकाराम महाराजांच्या पादुका हेलिकॉप्टरने श्रीक्षेत्र बोटा येथे आज जाणार
- चिंचवडच्या ज्येष्ठ नागरिकांनी घालविला वृद्धाश्रमात दिवस