दरकवाडी:
येथे श्री.जाखोबा देवाच्या उत्सवानिमित्त विविध कार्यक्रम झाले.महापूजा,अभिषेक,पालखी मिरवणूक काढण्यात आली.अखंड हरिनाम सप्ताहात नामयज्ञ करण्यात आला.बैलगाडा शर्यतीत शेकडो बैलगाडे धावले.
पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री.जाखोबा देवाच्या उत्सवानिमित्त मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते.पाच दिवस किर्तन,प्रवचन,हरिजागर,हरिपाठ,नामजप यज्ञ असे धार्मिक कार्यक्रम झाले.अन्नदान करण्यात आले.विश्वनाथ महाराज रिठे यांचे काल्याचे किर्तन झाले.कान्हेवाडीतील शंकर बाबा मठातील विद्यार्थ्यानी किर्तनास साथसंगत दिली.
बैलगाडा शर्यतीत दीडशे बैलगाडे धावले.पहिल्या क्रमांकात सतरा, दुसऱ्या क्रमांकात एकतीस, तिस-या क्रमांकात सोळा स्पर्धक विजयी ठरले.
अनुक्रमे अनिकेत संभाजी काळे( घोडेगाव), नितीन विलास लांडगे( वाडा), विकास सीताराम काटे( गोरेगाव) हे फळीफोड गाडे ठरले.
तर एक नंबर फायनलची बाजी महादेव नाईकडे( कडधे), नितीन पडवळ ( कडधे) यांनी मारली. दोन नंबर फायनल मध्ये गणेश वाडेकर( वाडा),व तीन नंबर फायनल मध्ये स्वराज्य संतोष भोर ( गुंडाळवाडी) यांनी बाजी मारली. विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. घाटाचा राजा हा किताब कुणाल प्रकाश पाचंगे यांच्या गाडयाने पटकाविला.
लातूर शिवसेना संपर्कप्रमुख शामराव पाच॔गे, सरपंच सीमा प्रभू पाचंगे, माजी सरपंच जाखोबा वाडेकर, उपसरपंच केतन लगड,ग्रामपंचायत सदस्य सुनंदा सुपे,अलका मोहन,सुभद्रा पोखरकर,भाग्यश्री पानमंद, उद्योजक नितीन वाडेकर,नाना पाचंगे, तंटामुक्त अध्यक्ष अरूण काळे,पोलीस पाटील सतीश मोहन, काशीनाथ पानमंद,रंगनाथ पाचंगे,सुभाष लांडगे,मंगेश पाचंगे,विकास भंडारे,नितीन लगड,नामदेव पाचंगे,मार्तंड लगड,शांताराम काळे,विक्रम भोसले,शांताराम काळे,विक्रम भोसले,बबुशा पाचंगे, पंकज काळे, विलास पवार उपस्थित होते.
शंकर पानमंद व यांनी सुत्रसंचालन केले.उत्सव समिती अध्यक्ष अरविंद पानमंद व उपाध्यक्ष नवनाथ लगड हे होते.
- महेंद्र भारती यांनी सामाजिक एकोपा केला निर्माण :डॉ. श्रीपाल सबनीस
- मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची कोअर कमिटी जाहीर
- ले.डॉ.संतोष गोपाळे यांची दिल्ली येथे होणाऱ्या एनसीसी शिबिरासाठी महाराष्ट्र संघाचे मार्गदर्शक म्हणून निवड
- वडगाव मावळच्या न्यू इंग्लिश स्कूलचे चित्रकला स्पध्रेत यश
- अनुसया दत्तात्रय निंबळे यांचे निधन