कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मान्यतेने शिवणेत आठवडे बाजार सुरू
सोमाटणे:
मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या  मान्यतेनुसार शिवणे ग्रुप ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून शिवणेत  आठवडे बाजार सुरू करण्यात आला आहे. गावातच आठवडे बाजार सुरू झाल्याने गृहिणीचा वेळ,पैसा व श्रम वाचणार आहे.
आठवडे बाजाराचे उद्घाटन सभापती संभाजी आनंदराव शिंदे व उपसभापती नामदेव नानाभाऊ शेलार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी  माजी जिल्हा परिषद सदस्य भरत शिंदे,संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक ज्ञानेश्वर ठाकर,
नितीन मुऱ्हे ,खंडू वाळुंज (अध्यक्ष मा.ता.कु. संघ),सखाराम गायकवाड ,शांताराम म्हस्के,राजू शिवणेकर,शिवाजी म्हस्के,किसन कुंभार ,तुकाराम लोहकरे ,अजित चौधरी,अजिंक्य टिळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक
सुभाष रघुनाथ जाधव , दिलीप नामदेव ढोरे , मारुती नाथा वाळूज , साहेबराव दशरथ टकले, विलास सदाशिव मालपोटे , बंडू दामू घोजगे, शिवाजी चिंधू असवले , विक्रम प्रकाश कलवडे , अमोल अरूण मोकाशी , नथुराम शंकर वाघमारे, साईनाथ दत्तात्रेय मांडेकर , नामदेव ज्ञानेश्वर कोंडे , विलास बबन मानकर , बाळासाहेब अंतू वाजे ,सुप्रिया अनिल मालपोटे ,अंजली गोरख जांभुळकर,सचिव मंगेश अनंतराव घारे, सरपंच महेंद्र लक्ष्मण वाळुंज,उपसरपंच  कविता अतुल शेटे ,सदस्य अविनाश पांडूरंग दिसले ,अंकुश बबन घारे,सुनिल विष्णू दाभाडे,संगीता  गणेश गायकवाड , मीनाक्षी ज्ञानेश्वर शिवणेकर ,विद्या समीर गायकवाड  ,शुभांगी राजेंद्र खैरे , ग्रामसेविका विद्या लोखंडे  उपस्थित होते.
कांदा घ्या..भाजी घ्या..कोथिंबीर घ्या.. ओ  दादा.. वांगी ,बटाटा, मेथी स्वस्तात लावली घ्या या आरोळीने पवन मावळातील शिवणे  गाव गजबजून गेले.गावातच ताजी आणि स्वच्छ भाजी मिळणार असल्याने गावातील गृहाणीचा वेळ,पैसे आणि श्रम वाचणार आहे.आज भरलेल्या  आठवडे बाजारात भाजीपालासह अन्य जिन्नस महिलांनी खरेदी केल्या.शेतक-यांनी पिकवलेला भाजीपाला आता थेट ग्राहकांच्या दारापर्यंत जाणार आहे.
उपसभापती नामदेव शेलार यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपक्रमांची  माहिती दिली. तर सभापती संभाजी शिंदे आठवडे बाजाराची  माहीती दिली. तसेच आठवडे बाजाराची उपयुक्तता आणि फायदे विशद केले.सरपंच  महेंद्र वाळुंज यांनी आभार मानले.

error: Content is protected !!