
मोरया दिनदर्शिका २०२४” प्रकाशन
वडगाव मावळ:
आमदार सुनिल शेळके, कुलस्वामिनी महिला मंच अध्यक्षा सारिका शेळके, राष्ट्रवादी काॅंग्रेस महिला तालुकाध्यक्ष दिपाली गराडे, तळेगाव रा. काॅ. महिला अध्यक्षा शैलजा काळोखे यांच्या उपस्थितीत “मोरया दिनदर्शिका २०२४” चे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी नगराध्यक्ष मयूर ढोरे, मोरया महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अबोली ढोरे, प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा चेतना ढोरे, आणि प्रतिष्ठानच्या पदाधिकारी, संचालिका तसेच वडगाव शहरातील जेष्ठ माता भगिनी आणि सहकारी उपस्थित होते.
या दिनदर्शिकेचे वैशिष्ट्ये म्हणजे यात शहरातील नागरिकांना सर्व प्रकारच्या सेवा पुरवणाऱ्या सामाजिक, शासकीय अशा विविध संस्थांचे तसेच छोट्या मोठ्या अस्थापणांचे संपर्क क्रमांक देण्यात आले आहेत.
वडगाव शहरात होत असलेल्या विविध विकासकामांमुळे शहर अतिशय वेगाने वाढत आहे. तशा विविध प्रकारच्या समस्यांचा देखील नागरिकांना सामना करावा लागत असतो. या गोष्टींचा विचार करून सामाजिक बांधिलकी जपत वैशिष्ट्यपूर्ण अशी मोरया दिनदर्शिका बनविण्यात आलेली आहे.
येत्या आठवडाभरात संपूर्ण वडगाव कातवीतील सर्व रहिवाशांना मोरया दिनदर्शिका विनामूल्य घरपोच वाटप करण्यात येत आहे अशी माहिती मोरया महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अबोली ढोरे यांनी दिली.
- वडगाव मावळला उद्यापासून शिवजयंतीचे कार्यक्रम
- जागतिक महिला दिन व महाराष्ट्र लोकधारा न्यूज प्रथम वर्धापन दिनानिमित्त : क्राईम रिपोर्टर श्रावणी कामत यांना पुरस्कार सन्मान सोहळ्यासह रंगला खेळ पैठणीचा..! महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
- गुरूवारी समर्थ शलाका शिष्यवृत्ती परीक्षा पारितोषिक वितरण सोहळा
- सावित्रीबाई फुले स्मृतिदिनानिमित्त कार्यक्षम महिलांचा प्रातिनिधिक सन्मान
- मनिषा सातपुते बेस्ट लाइफ कोच अवॉर्डने सन्मानित




