तळेगाव स्टेशन:
मामासाहेब खांडगे इंग्लिश मिडीयम स्कूलच्या प्रांगणात खेळाचे धडे गिरवलेले चैतन्य शांताराम कोंडभर ओम प्रविण माने,सारस श्रीकांत जोगी आणि मावळातील संतोष नरेंद्र चौहान यांची १६ वर्षाखालील महाराष्ट्राच्या संघात निवड झाली.या सर्वाचेच मामासाहेब इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये अभिनंदन करण्यात आले.
या सर्वांचा गौरव करण्यात आला तर प्रशिक्षक
ही बाब कौतुकास्पद आहे.महाराष्ट्राच्या टीम मध्ये सिलेक्शन झालेल्या सर्वाचे अभिनंदन केले.शाळेच्या वतीने सर्व खेळाडूंचा सन्मान केला.तसेच प्रशिक्षक व पालकांचाही सत्कार केला.प्रशिक्षक अनिल भास्कर नाईक यांना क्रिकेट रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या सन्मान सोहळ्यात पालक व प्रशिक्षक यांच्या डोळ्यातून वाहिलेले आनंदाश्रू पाहताना उपस्थिती सर्वाच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या.
चैतन्य शांताराम कोंडभर, ओम प्रवीण माने,सारस श्रीकांत जोगी,संतोष नरेंद्र चौहान हे चौघे जण महाराष्ट्राच्या टीम मधून खेळणार आहे.या नंतर,त्यांनी देशासाठी खेळावे अशा शुभेच्छा देण्यात आल्या. या सन्मान सोहळ्यात प्रशिक्षक हेमंत किनीकर,मनीष देसाई,किरण भोंसले,दत्तात्रय वालके,प्रशांत कांबळे,बेंनीवाल सर,प्रसाद सावंत यांचाही सन्मान करण्यात आला.
जीनीयस क्रिकेटअकादमी सुहास गरुड़,संदीप घारे,ज्ञानेश्वर बो-हाडे,प्रवीण माने,हिरामन जम,अमोल पाटील,संदीप अग्रवाल,संदीप पानसरे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते.
मामासाहेब खांडगे इंग्लिश मिडीयम स्कूलचे अध्यक्ष गणेश खांडगे, नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे संचालक नंदकुमार शेलार,एम्बिशियस क्रिकेट चे सर्वेसर्वा मनीष देसाई उपस्थित होते.
मामासाहेब खांडगे इंग्लिश मिडीयम स्कूलचे अध्यक्ष गणेश खांडगे म्हणाले,” मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलांनी जिद्द चिकाटी व मेहनतीच्या जोरावर मिळवलेले यश कौतुकास्पद आहे.मुलांच्या या यशात त्यांचे पालक, प्रशिक्षक व मित्र मंडळींचा सहभाग आहे.शाळेसाठी आणि मावळ तालुक्यांसाठी या चौघांची निवड भूषणावह आहे.
- कामशेतच्या आश्रमशाळेत पिकणार फळभाज्या
- ॲड.बापूसाहेब भोंडे हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न : डॉ.अशोक खाडे यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडली जीवनगाथा
- प्रशासकीय अधिकारी बनण्यासाठी शालेय जीवनात स्पर्धा परिक्षेची तयारी आवश्यक – संतोष खांडगे
- संत तुकाराम महाराजांच्या पादुका हेलिकॉप्टरने श्रीक्षेत्र बोटा येथे आज जाणार
- चिंचवडच्या ज्येष्ठ नागरिकांनी घालविला वृद्धाश्रमात दिवस