आनंद नवघणे यांच्या वाढदिवसानिमित्त ब्राम्हणवाडीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना कपडे व खाऊ वाटप
वडगाव मावळ: ब्राम्हणवाडी ता.मावळ येथील शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आनंद खंडू नवघणे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना कपडे व खाऊ वाटप करण्यात आला.वाढदिवसानिमित्त अनाठायी खर्चाला फाटा देत आनंद नवघणे यांनी शैक्षणिक उपक्रम राबवून आदर्श पायंडा अधोरेखित केला.
मावळ तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागात वाढदिवसानिमित्त असे सामाजिक उपक्रम राबविण्यावर तरूणाचा कल आहे.याच अनुषंगाने आनंद नवघणे यांनी राबविलेला हा उपक्रम अनुकरणीय असल्याच्या भावना अनेकांनी व्यक्त केल्या.
उद्योजक व उच्चशिक्षित अशी ओळख असलेले आनंद खंडू नवघणे प्रगतशील शेतकरी आहेत.आनंद नवघणे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष असल्याने ब्राह्मणवाडी सातेच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शैक्षणिक उपक्रम राबविण्यावर त्यांचा कल असतो.याच अनुषंगाने हा उपक्रम राबविण्यात आला.
इयत्ता पहिली ते सातवी मधील विद्यार्थ्यांना रंगीत कपड्यांचे तसेच खाऊचे वाटप करण्यात आले. त्यावेळी मावळ पंचायत समितीचे माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर,सातेचे सरपंच गणेश बोऱ्हाडे ,ग्रामपंचायत उपसरपंच नितीन मोरे, सदस्य सखाराम काळोखे, स्वप्निल नवघणे ,संदीप शिंदे, माजी उपसरपंच नवनाथ शेळके,माजी अध्यक्ष राजेंद्र बोऱ्हाडे, उद्योजक रोहिदास नवघणे, गणेश जगदाळे, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे माजी अध्यक्ष संजय शिंदे, संकेत शिंदे, उद्योजक हनुमंत नवघणे, मुख्याध्यापक सरिता पवार व शिक्षक वृंद तसेच शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष सर्व सदस्य आणि ग्रामस्थ पालक वर्ग विद्यार्थी उपस्थित होते.
माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर म्हणाले,” विद्यार्थ्यांनी प्रयत्नांची कास धरावी.अनेक संकटे आणि अपयशावर मात करीत यशस्वी झालेल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांचे उदाहरण त्यांनी दिले.
सरपंच गणेश बो-हाडे म्हणाले,”आनंद नघवणे यांच्या नावात आनंद आहे.त्यांच्या उपस्थितीत आनंद,समाधान आणि.चैतन्य अनुवता येते.वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या या उपक्रमाने आम्ही सर्व आनंदी झालो आहोत.
रेश्मा आनंद नवघणे म्हणाल्या,” सामाजिक भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावरील आनंद ओसांडून वाहत होता.विद्यार्थ्यांनी सकारात्मक विचार रुजवून करियर मिळवावे.
सरिता पवार यांनी प्रास्ताविक केले. नवनाथ शेळके यांनी सुत्रसंचालन केले. वैभव नवघणे यांनी आभार मानले.