वेल्हे तालुक्यातील दुर्गम भागातील कुटुंबांना फराळ वाटप
पिंपरी:
महा एनजीओ फेडरेशन संस्थेच्या श्री शेखर मुंदडा यांच्या आत्मनिर्भर दिवाळी संकल्पनेच्या उपक्रम अंतर्गत तसेच टेलस ऑर्गानायझेशन पुणे, यांच्या माध्यमातून दिवाळीनिमित्त वेल्हे तालुक्यातील वडघर, डिघी वस्ती, पोळे, खानू अशा काही दुर्गम भागात राहणाऱ्या धनगर, कोळी, कातकरी व इतर समाजाच्या सुमारे 70 कुटुंबांना दिवाळी फराळ वाटप करण्यात आला.
तसेच टेलस संस्थेचे दिवंगत सुमती आचार्य यांच्या स्मरणार्थ डीगी वस्ती या अतिदुर्गम भागातील वंचित कुटुंबांना गव्हाच्या पिठाचे वाटप करण्यात आले. टेलस संस्थेचे लोकेश बापट व विश्वास घावटे यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते. याप्रसंगी संस्थेचे कार्यकर्ते राजन कुबेर, मंजू घावटे, जान्हवी बापट तसेच समाजसेवक तुकाराम दादा कोकरे वडघर गावचे सरपंच नथुराम डोईफोडे व संतोष मर्गळे या स्थानिकांचे मोठे सहकार्य यावेळी लावले.