क्रीडास्पर्धेतील विद्यार्थीनी प्रमुख पाहुण्या, अनोखे रावणदहन संपन्न
कामशेत:
येथील महर्षी कर्वे आश्रम शाळेत रावण दहन कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रकल्प स्तरावर विजय संपन्न केलेल्या यशस्वी मुलींपैकी कार्तिकी गवारीने कार्यक्रमाचे अध्यक्षपद व सुशीला सांबरी हिने उपाध्यक्ष भूषविले .
इतर यशस्वी विद्यार्थीनी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांच्याच हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. शाळेत गेली नऊ दिवस वेगवेगळे कार्यक्रम संपन्न झाले.
नऊ दिवस शाळेत नवदुर्गा पूजन, कथा तसेच प्रत्येक दिवशीच्या रंगाचं पर्यावरणविषयक व वैज्ञानिक महत्त्व हे विद्यार्थ्यांना पटवून देण्यात येत होते. शाळेत पहिल्या दिवशी शैलपुत्री देवी, दुसऱ्या दिवशी ब्रह्मचरणी देवी ,तिसऱ्या दिवशी चंद्रघटा देवी ,चौथा दिवशी कुष्मांडादेवी , पाचव्या दिवशी स्कंदमाता देवी ,सहाव्या दिवशी कात्यायनी देवी ,सातवा दिवशी कालरात्री ,आठव्या दिवशी महागौरी देवी, नवव्या दिवशी सिद्धिदात्री देवींची पूजा केली जात होती आणि त्यांची माहिती सांगितली जात होती.
पहिल्या दिवशी घटस्थापना करून विधीनुसार पूजा करण्यात आली. आठव्या दिवशी शाळेमध्ये भोंडल्याचा कार्यक्रम देखील मोठ्या उत्साहात संपन्न झाला.कार्यक्रमास उपस्थित अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांचं स्वागत शाळेतील विद्यार्थिनींनी आश्रम गीताने केले. विभागीय स्तरावर निवड झालेल्या सर्व खेळाडूंचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले .
शाळेतील अंजली हेमाडे ,नंदीनी पावरा, सानिया होले, सुशीला सांबरी व कार्तिकी गवारी हिने आपली मनोगते व्यक्त केली. शाळा समितीचे सदस्य पंढरीनाथ वाडेकर यांनी यशस्वी खेळाडूंना असा अनोखा सन्मान देण्याची कल्पना मांडली.
आपल्या भाषणात त्यांनी मुलांना पर्यावरणाचा संवर्धन व स्वतःमधील वाईट प्रवृत्ती यांच्यावर प्रकाश टाकला. शेवटी रावण दहन करत असताना शाळेतील विद्यार्थी ,शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी आपल्या स्वतःमधील दोन वाईट प्रवृत्तीची तसेच पर्यावरणाला घातक सवयी लिहिलेल्या चिठ्या त्या रावणाच्या प्रतिकृतीमध्ये ठेवून त्याचे दहन केले. कार्यक्रमास शाळा समितीचे सदस्य धनंजय वाडेकर, विक्रम बाफना,नवनाथजी ठाकर तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता देवरे, प्रभारी मुख्याध्यापक पवार सर शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ,पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
या कार्यक्रमाचे आभार शाळेतील माधुरी राक्षे हिने मानले तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील तनुजा लांघी हिने केले.
- कामशेतच्या आश्रमशाळेत पिकणार फळभाज्या
- ॲड.बापूसाहेब भोंडे हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न : डॉ.अशोक खाडे यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडली जीवनगाथा
- प्रशासकीय अधिकारी बनण्यासाठी शालेय जीवनात स्पर्धा परिक्षेची तयारी आवश्यक – संतोष खांडगे
- संत तुकाराम महाराजांच्या पादुका हेलिकॉप्टरने श्रीक्षेत्र बोटा येथे आज जाणार
- चिंचवडच्या ज्येष्ठ नागरिकांनी घालविला वृद्धाश्रमात दिवस