वडगाव मावळ:
वन्यजीव रक्षक मावळ संस्था व पुणे वनविभाग, पुणे यांच्या संयुक्तविद्यमाने मावळ तालुक्यातील २७००+ विद्यार्थिना मध्ये वन्यप्राण्यांना विषयी जनजागृती केली.
वन्यजीव सप्ताह देशभर १-७th ऑक्टोर साजरा केला जातो. या वर्षी वन्यजीव रक्षक मावळ संस्था व पुणे वनविभाग, पुणे यांच्या संयुक्तविद्यमाने मावळ तालुक्यात गावो गावी फिरून विद्यार्थिना जनजागृती केली. वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश गराडे अध्यक्ष अनिल आंद्रे ,सदस्य जिगर सोलंकी यांनी मुलांना मावळ तालुक्यातील आढळणारे वन्यप्राणी आणि त्यांचे महत्व, तसचे मानवी जीवनावर त्या वन्यप्राणी चे प्रभाव कसे आहे ते समजून दिले. या ५ दिवसा मध्ये वनविभाग शिरोता, वनविभाग वडगांव व वन्यजीव रक्षक मावळ संस्था १५ गावांन मध्ये जाऊन जनजागृती केली.
कुणे नामा, देवघर,उकसानन,गोवित्रीी, साई, नानोली, नवलाख उंब्रे, निगडे, मळवली, कडधे, शिवणे,आढले खुर्द, वडगांव मावळ, भोयरे, इंगळूण गावात जाऊन जागृती केली.
वन्यजीव सप्ताह दरम्यान काही जखमी प्राणी जसे सांबर व ११ बगळे उपचारा साठी पाठवण्यात आले. साप, कासव, पक्षी त्यांच्या अधिवासात सोडण्यात आले.
वनपरिक्षेत्र अधिकारी शिरोता सुशील मांतावर ,वानपाल एस एस बुचडे, पी एम रासकर , घुगे , तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी हनुमंत जाधव वडगांव मावळ, वानपाल ऐक के. हिरेमट, स. चुटके , ड. दोमे आणि सर्व वनरक्षक व वनमजूर उपस्थित होते.
तसेच वन्यजीव रक्षक मावळ संस्था चे संस्थापक निलेश गराडे , अध्यक्ष अनिल अंद्रे सदस्य संतोष दहिभाते, संकेत भानुसघरे, शत्रुघ्न रसांकर,विकी दौंडकर, साहिल नायर उपस्थित होते.
कोणता ही वन्यप्राणी जखमी अवस्थेत अढळ्यास जवळ पास च्या प्राणीमित्र ला किंवा वनविभागला संपर्क (१९२६) करावा असे आव्हान वन्यजीव रक्षक मावळ संस्थे चे संस्थापक निलेश गराडे (९८२२५५५००४) आणि अधक्ष्य अनिल आंद्रे यांनी केले.
ऑक्टोबर महिन्यातील पहिल्या आठवड्यात जागतिक वन्यजीव सप्ताह साजरा केला जातो.सर्वांमध्ये वन्यजीवांविषयी जनजागृती व्हावी हा त्यामागे मुख्य उद्देश असतो.आणि शालेय जीवनातच वन्यजीवांचे महत्व कळाले तर त्याचा अतिशय सकारात्मक परिणाम होतो त्यामुळे आपण या वर्षी जनजागृती करणे करिता मावळातील शाळा आणि विद्यार्थ्यांना लक्ष केले आणि विशेष म्हणजे विद्यार्थी वर्गाकडून आम्हाला अप्रतिम प्रतिसाद मिळाला.याकामी आम्हाला मावळ वन्यजीव रक्षक संस्थेचा मोठा हातभार लाभला त्याकरिता त्यांचे देखील विशेष आभार असल्याचे सुशील मंतावार
वनपरिक्षेत्र अधिकारी शिरोता म्हणाले.
मावळ तालुक्यात सापांच प्रमाण खूप जास्त आहे, तालुक्यात ३६ जातीचे साप आढळुण येतात, त्यातील ४ विषारी साप प्रामुख्याने मानव वस्ती मध्ये आढळुण येतात, नाग, मण्यार , घोणस, फुरसे .
वन्यजीव सप्तहानिमित्त डोंगराच्या कडे ला असणारे गावानं मध्ये जाऊन विद्यार्थि मध्ये जागृति करून त्यांनी काळजी घेण्याचे आव्हान केले.
नागरिकांनी आपल्या घराच्या परिसरात साफसफाई ठेवावी व रात्री च बाहेर जातांना पायात बुट आणि हातामध्ये टॉर्च असेले पाहिजे. चुकून साप चावल्यानंतर घाबरून न जाता जवळ पास च्या रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावे असे आवाहन जिगर सोलंकी प्राणी अभ्यासक वन्यजीव रक्षक मावळ संस्था यांनी केले.
- माघ शुद्ध दशमीच्या डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांच्या कीर्तनाला स्थगिती
- ‘मनाचे श्लोक’ पाठांतर स्पर्धेस मोठा प्रतिसादात संपन्न
- वस्तीगृहातील मुलींसमवेत लेकीचा वाढदिवस : बाबन्ना कुटुबांचे बर्थडे सेलेब्रिशेन
- मावळ राष्ट्रवादीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री पवार व आमदार शेळकेंच्या अभिनंदनाचा ठराव
- राज्यस्तरीय अभिवाचन स्पर्धेत ‘बलम सामी’ प्रथम