भारत राष्ट्र समिती पक्षाच्या तालुकाध्यक्ष पदी संतोष दळवी
वडगाव मावळ:
भारत राष्ट्र समिती पक्षाच्या मावळ तालुका अध्यक्षपदी संतोष दळवी यांची निवड करण्यात आली. पुण्यातील हॉटेल मल्टी स्पाइस येथे भारत राष्ट्र समिती पक्षाच्या पुणे जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्षांची बैठक पार पडली.या बैठकीत मावळ तालुक्याची जबाबदारी संतोष दळवी यांच्या देण्यात आली.
पुणे जिल्हा प्रभारी बाळासाहेब सानप, फिरोज पटेल, संतोष हंबर्डे, पुणे जिल्हा समन्वयक राहुल काळभोर यांनी संतोष दळवी यांची भारत राष्ट्र समिती पक्षाच्या मावळ तालुका अध्यक्षपदी निवड जाहीर केली.
संतोष दळवी म्हणाले,” लवकरच जनतेच्या प्रश्नांवर तालुक्यात आवाज उठवणार आहे. तालुक्यातील अनेक प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी लोकशाही मार्गाने अंदोलन करणार आहे. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी शहर व विभाग निहाय निवड नियुक्तया करून कार्यकर्त्यांचे जाळे उभे करण्यात येईल.
तालुक्यातील ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, विधानसभा, लोकसभा निवडणुका पक्ष तालुक्यात स्वबळावर लढवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.मनोहर पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य भाई भरत मोरे, भाऊसाहेब तुपे, अतुल येवले, भारत पवळे, अरविंद कांबळे, प्रफुल्लताई मोतलिंग, संजय कोंडे उपस्थित होते.
- माघ शुद्ध दशमीच्या डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांच्या कीर्तनाला स्थगिती
- ‘मनाचे श्लोक’ पाठांतर स्पर्धेस मोठा प्रतिसादात संपन्न
- वस्तीगृहातील मुलींसमवेत लेकीचा वाढदिवस : बाबन्ना कुटुबांचे बर्थडे सेलेब्रिशेन
- मावळ राष्ट्रवादीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री पवार व आमदार शेळकेंच्या अभिनंदनाचा ठराव
- राज्यस्तरीय अभिवाचन स्पर्धेत ‘बलम सामी’ प्रथम