प्रादेशिक पाणी योजनांच्या कामांना गती देण्याचे आमदार सुनिल शेळके यांचे आदेश
वडगाव मावळ:
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अखत्यारीत येत असलेल्या मावळ तालुक्यातील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या कामांना गती देण्याचे आदेश आमदार सुनिल शेळके यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
संबंधित विभागाचे अधिकारी,स्थानिक लोकप्रतिनिधी,ग्रामस्थ यांच्यासोबत झालेल्या संयुक्त बैठकीत आमदार सुनिल शेळके यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत येत असलेल्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या कामाचा आढावा घेतला.पाणी योजनांची सद्यस्थिती व गाव पातळीवरील अडीअडचणी,समस्या स्थानिक लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ यांच्याकडून जाणून घेतल्या.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत खडकाळा-कामशेत, डोणे-आढले, कार्ला,पाटण, कुसगाव-डोंगरगाव या सर्व पाणीपुरवठा योजनांसाठी निधी उपलब्ध झालेला असुन कामे सुरु आहेत.या योजनांतर्गत येत असलेल्या कामशेत, दिवड,आढले,ओव्हळे, डोणे,कार्ला, देवघर,वेहेरगाव, दहिवली, वाकसई, शिलाटणे, पाटण,भाजे,सदापूर,औंढे, बोरज,मळवली,देवले,औंढोली, कुसगाव बु.,डोंगरगाव या गावांमध्ये सद्यस्थितीत होणाऱ्या पाणी पुरवठ्याबद्दलची माहिती घेतली.
अनेक वर्षांपासून या योजना प्रलंबित आहेत.या योजनांच्या कामातील दिरंगाईमुळे ग्रामस्थांसह महिला-भगिनींना देखील मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागतो.सद्यस्थितीत या गावांमधील पाणीपुरवठ्याचे स्त्रोत काय आहेत, कशा पद्धतीने पाणीपुरवठा केला जातो,किती पाणी उचलण्यात येते व पाणीपुरवठ्याचे नियोजन कशा पद्धतीने होत आहे याचे मूल्यमापन करुन सविस्तर अहवाल सादर करावा,अशा सूचना आमदार शेळके यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
तसेच ग्रामस्थांची पाणी समस्या दूर करण्यासाठी नव्याने काम सुरु झालेल्या पाणी योजनांच्या कामांना गती देण्याचे आदेश अधिकाऱ्यांना यावेळी दिले.
याबैठकीस माजी पं.स.सदस्य दिपक हुलावळे,कार्यकारी अभियंता पी.सी.भांडेकर, गटविकास अधिकारी सुधीर भागवत, अभियंता राजेश कुलकर्णी,धनंजय जगधने, वनपरिक्षेत्र अधिकारी हनुमंत जाधव,पाटबंधारे विभागाचे उपअभियंता राहुल गव्हाणकर तसेच ग्रामसेवक, सरपंच,सदस्य,ग्रामस्थ उपस्थित होते.
- माघ शुद्ध दशमीच्या डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांच्या कीर्तनाला स्थगिती
- ‘मनाचे श्लोक’ पाठांतर स्पर्धेस मोठा प्रतिसादात संपन्न
- वस्तीगृहातील मुलींसमवेत लेकीचा वाढदिवस : बाबन्ना कुटुबांचे बर्थडे सेलेब्रिशेन
- मावळ राष्ट्रवादीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री पवार व आमदार शेळकेंच्या अभिनंदनाचा ठराव
- राज्यस्तरीय अभिवाचन स्पर्धेत ‘बलम सामी’ प्रथम