इनरव्हील क्लब ऑफ तळेगांव दाभाडे तर्फे रक्षाबंधन
तळेगाव दाभाडे:
इनरव्हील क्लब ऑफ तळेगांव दाभाडेच्या सभासदांनी शहरातील पोलीस बांधवांना राख्या बांधल्या. पोलिस हे समाजासाठी अविरत, अव्याहतपणे कार्य करत असतात. सामाजिक सुरक्षा आणि सलोख्यासाठी ते सद् रक्षणार्थ कायम तत्पर असतात.
सदैव ताणतणावाचा सामना करीत असतात. रक्षाबंधनाच्या निमित्ताने त्याची जाणीव ठेवून कृतज्ञता व्यक्त करण्याचे प्रेसिडेंट संध्या थोरात यांनी ठरवले. राखी बांधल्या नंतर त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद अवर्णनीय होता. विशेष म्हणजे तेथील महिला पोलीस कर्मचाऱ्यांनाही राख्या बांधल्या. अनपेक्षित सुखद धक्क्याने महिला पोलिस कर्मचाऱ्यांनाही विशेष आनंद झाला.
प्रेसिडेंट संध्या थोरात यांनी इनरव्हील क्लब बद्दल थोडक्यात माहिती दिली. सेक्रेटरी निशा पवार, जॉईंट सेक्रेटरी रश्मी थोरात, सीसी संगीता शेडे, पास्ट प्रेसिडेंटस् शर्मिला शहा व वैशाली जामखेडकर तसेच साधना भेगडे, ज्योती देशपांडे, शलाका वाणी, अरुणा कुलकर्णी, चांदनी गांधी, मोहिनी भेगडे यांनी पोलिस बांधवांना शुभेच्छा देत रक्षाबंधन केले.
- माघ शुद्ध दशमीच्या डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांच्या कीर्तनाला स्थगिती
- ‘मनाचे श्लोक’ पाठांतर स्पर्धेस मोठा प्रतिसादात संपन्न
- वस्तीगृहातील मुलींसमवेत लेकीचा वाढदिवस : बाबन्ना कुटुबांचे बर्थडे सेलेब्रिशेन
- मावळ राष्ट्रवादीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री पवार व आमदार शेळकेंच्या अभिनंदनाचा ठराव
- राज्यस्तरीय अभिवाचन स्पर्धेत ‘बलम सामी’ प्रथम