तळेगाव दाभाडे:
येथील शाळा चौकातील  ऐतिहासिक  श्री विठ्ठल मंदिराचा वर्धापन दिन विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन  करून  भक्तिभावाने  साजरा  करण्यात आला. 

     पहाटे श्री विठ्ठल मंदिरात  काकड आरती भजन   विष्णूसहस्त्रनाम  तुलशीपत्र दान सोहळा हरिपाठ  आदी कार्यक्रमांचे  यशस्वी  आयोजन करण्यात आले होते. 
   पहाटेची महापूजा  उद्योजक प्रशांत एकनाथ दाभाडे साहेबराव दाभाडे यांचे परिवाराकडून करण्यात आली. 
  
    या कार्यक्रमाचे आयोजन ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज दाभाडे माऊली, यतिनभाई शहा ,किरण गवारे ,अतुल देशपांडे ,किशोर दरेकर , निवृत्ती महाराज फाकटकर, पांडुरंग गदादे ,सुभाष बेल्हेकर ,संपतराव गराडे  ,मुरलीधर ढेकणे, योगेश अवसरकर, छबुराव भेगडे ,प्रकाश वालझाडे  ,हरिदास  वनारसे ,द्वारकानाथ थोरात  ,अरविंद  हांडेपाटील   ,अनिल  फाकटकर ,लक्ष्मण शेलार यांनी केले.

error: Content is protected !!