इंदोरी:
येथील चैतन्य चारिटेबल फाउंडेशन संचालित चैतन्य इंटरनॅशनल स्कूल येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. अधिवक्ता ॲड संजय शिंदे, संस्थेचे अध्यक्ष भगवान शेवकर,मुख्याध्यापिका जेसी रॉय यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय ध्वजवंदन करण्यात आले.
इयत्ता ६ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांनी आकर्षक मार्च पास्ट कवायती केली. सुमधुर आणि देशप्रेमानी ओतप्रोत असलेले समूह गीत सादर झाले एरोबिक्स, साइकिलिंग, डम्बल ड्रिल, रिंग ड्रिलचे सादरीकरण झाले. मलखांब सादरीकरण हे मुख्य आकर्षण होते. विद्यार्थ्यांनी दोरी आणि पोल मलखांब कवायती सादर केल्या.प्राचार्या जेसी रॉय यांनी स्वातंत्र्यसैनिकांच्या प्रयत्नांना कधीही विसरता कामा नये यावर प्रकाश टाकला.
प्रमुख पाहुणे अधिवक्ता ॲड. श्री.संजय शिंदे यांनी शाळेशी जोडलेल्या स्मृतींना उजाळा दिला व शाळेनी केलेल्या प्रगतीचे कौतुक केले.अध्यक्ष भगवान शेवकर म्हणाले,” मानसिकदृष्ट्या स्वतंत्र असण्याची गरज आहे या मुद्द्यावर भर दिला.