आढे:
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून आढेतील  जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील गुणवंतांचा  सत्कार समारंभ सोहळा पार पडला.शिष्यवृत्ती परिक्षेत घवघवीत यश मिळवून देणारे श्रीकांत दळवी व शिष्यवृत्ती जिल्हा गुणवत्ता यादीत भरघोस यश संपादन केलेल्या आढे शाळेतील  वैशाली अभय जुन्नरकर
यांचा मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

या शैक्षणिक वर्षात या जिल्हा परिषद शाळेतील जिल्हा गुणवत्ता यादीत आलेल्या १४ विद्यार्थी व शिक्षकांचा गौरव चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला शोभा वहिले विस्तार अधिकारी काले कॉलनी बीट,  ताते सर केंद्र बौर, मंगला आहेर शिष्यवृत्ती मार्गदर्शन लेखिका, डॉ.गोपाळघरे स्त्रीरोगतज्ञ तळेगाव दाभाडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.

गुणवत्ता यादीतील मावळ तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला सात विद्यार्थ्यांना गौरव चिन्ह, ड्रेस, सॅक, पॅड, डबा असे विविध भेटवस्तू देऊन व१६ विद्यार्थ्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. शाळेतील राज्यस्तरीय मंथन परीक्षेत यश संपादन केलेल्या इयत्ता पहिली ते सातवी वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचा देखील यथोचित गौरव चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

शाळा व्यवस्थापन समिती , ग्रामपंचायत , ग्रामस्थ मंडळींनी मोठ्या आनंदाने सहभाग घेऊन समारंभ थाटामाटात साजरा केला. या कार्यक्रमात मान्यवरांनी आपल्या मनोगतात गावकऱ्यांचे व विद्यार्थ्यांचे कौतुक पर भाषणे केली. मंगल आहेर, डॉ. गोपाळघारे, वहिले  यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा दर्जा व शिक्षकांचे विद्यार्थ्यांसाठी शिकवण्याची तळमळ आपल्या भाषणातून सुंदर शब्दात मांडली. बौर केंद्राचे केंद्रप्रमुख ताते यांनी प्रास्ताविक केले. सरपंच सुनीता ज्ञानेश्वर सुतार  यांनी आभार मानले.

सुनिता ज्ञानेश्वर सुतार (सरपंच ),बाबा हिंगडे (उपसरपंच ),मैना अरुण ठाकर (ग्रा. सदस्य ),संगीता  लक्ष्मण सुतार (ग्रा. सदस्य ) ,जालिंदर बोत्रे (ग्रा. सदस्य ), मच्छिंद्र सुतार (ग्रा. सदस्य ), भामा बाई सुतार (ग्रा. सदस्य ) ,सुभाष  ठाकर(पो. पाटील ) ,अंकुश नाना सुतार, युवराज सुतार, ज्ञानेश्वर सुतार, पिंटू तिडके,अंकुश करके, चंद्रकांत सुतार,शंकर सुतार, महेश ठाकर,नवरंग सुतार सोमनाथ सुतार, कुंडलिक सुतार उपस्थित होते.

error: Content is protected !!